टेक्नो कॅमॉन आय स्कायचे आगमन

By शेखर पाटील | Published: April 18, 2018 04:00 PM2018-04-18T16:00:00+5:302018-04-18T16:00:00+5:30

टेक्नो मोबाइल्स कंपनीने आय स्काय या नावाने नवीन मॉडेल बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केली आहे. टेक्नो मोबाईल्स कंपनीने या वर्षाच्या प्रारंभी कॅमॉन आय आणि कॅमॉन आय एयर हे दोन स्मार्टफोन बाजारपेठेत उपलब्ध केले होते.

The arrival of tecno camon i scaci | टेक्नो कॅमॉन आय स्कायचे आगमन

टेक्नो कॅमॉन आय स्कायचे आगमन

googlenewsNext

टेक्नो मोबाइल्स कंपनीने आय स्काय या नावाने नवीन मॉडेल बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केली आहे. टेक्नो मोबाईल्स कंपनीने या वर्षाच्या प्रारंभी कॅमॉन आय आणि कॅमॉन आय एयर हे दोन स्मार्टफोन बाजारपेठेत उपलब्ध केले होते. आता कॅमॉन याच मालिकेत आय स्काय हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. आधीच्या मॉडेलनुसार हा स्मार्टफोनही किफायतशीर मूल्यात सादर करण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेत या सेगमेंटमध्ये प्रचंड स्पर्धा असताना कॅमॉन आय स्कायला तगडे आव्हान असणार आहे.

टेक्नो कॅमॉन आय स्काय या मॉडेलमध्ये फेस अनलॉक हे फिचर देण्यात आले आहे. अर्थात चेहर्‍याच्या मदतीने स्मार्टफोन अनलॉक करण्याची सुविधा यात दिलेली आहे. तसेच हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ८.१ ओरियो या आवृत्तीवर चालणारा आहे. यामध्ये ड्युअल एलईडी फ्लॅशयुक्त १३ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा दिलेला आहे. तर स्वतंत्र सेल्फी फ्लॅशसह यात ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये मेटॅलिक आवरण देण्यात आल्यामुळे हा स्मार्टफोन अतिशय मजबूत असा आहे. यामधील ५.४५ इंच आकारमानाचा डिस्प्ले हा १९:८ अस्पेक्ट रेशो असणारा आणि फुल व्ह्यू या प्रकारातील असून याची रेझोल्युशन क्षमता ९६० बाय ४८० पिक्सल्स इतकी आहे. तर यामध्ये ३,०५० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.

टेक्नो कॅमॉन आय स्काय या स्मार्टफोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-यूएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हिटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन ग्राहकांना ७,४९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे.

Web Title: The arrival of tecno camon i scaci

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल