Asus 8Z Price In India: छोटा पॅकेट बडा धमाका! 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह धुमाकूळ घालण्यासाठी आला ‘हा’ 5G Smartphone
By सिद्धेश जाधव | Published: February 28, 2022 04:24 PM2022-02-28T16:24:40+5:302022-02-28T16:24:56+5:30
Asus 8Z Price In India: Asus 8Z भारतात 64MP कॅमेरा, 8GB RAM 120Hz रिफ्रेश रेट आणि 4000mAh बॅटरीसह उतरवण्यात आला आहे.
Asus नं आपला नवीन ASUS 8Z अखेरीस भारतात सादर केला आहे. हा फोन गेल्यावर्षी मे महिन्यात जागतिक बाजारात लाँच झाला आहे. परंतु कोरोना काळ असल्यामुळे कंपनीनं अनेकदा या मोबाईलचा लाँच पुढे ढकलला होता. हा एक कॉम्पॅक्ट डिजाइन असलेला फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. ज्यात 64MP कॅमेरा, 8GB RAM 120Hz रिफ्रेश रेट आणि 4000mAh ची बॅटरी मिळते.
Asus 8Z Price In India
ASUS 8Z चा एकच भारतीयांच्या भेटीला आला आहे. कंपनीनं या फोनची किंमत 42,999 रुपये ठेवली आहे. ज्यात 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. हा फोन फ्लिपकार्टवरून 7 मार्चपासून विकत घेता येईल. या स्मार्टफोनचे Black आणि Silver कलर ऑप्शन उपलब्ध होतील.
Asus 8Z स्पेसिफिकेशन्स
Asus 8Z स्मार्टफोनमध्ये 5.9 इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो HDR10, 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1100nits ब्राईटनेसला सपोर्ट करतो. 20:9 आसपेक्ट रेश्यो असलेल्या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास विक्ट्सची सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच IP68 पाणी आणि धुळीपासून संरक्षण करते.
फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 5G SoC सह Adreno 660 GPU देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB UFS 3.1 स्टोरेजला सपोर्ट करतो. ही स्टोरेज मेमरी कार्डनं वाढवता येते. फोन Android 11 वर आधारित ZenUI 8 कस्टम स्किनवर चालतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
Asus 8Z मधील ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये ओआयएस 64MP चा मुख्य Sony IMX686 सेन्सर देण्यात आला आहे. सोबत 12MP चा अल्टा-वाईड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. हा आसुस फोन 12MP च्या Sony IMX663 फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
- Flipkart Sale: फक्त आजचा दिवस! Motorola च्या फाडू Tablet वर 37 टक्के ऑफ; सोबत अतिरिक्त डिस्काउंटही
- अपघात आणि चालान दोन्हीपासून वाचवेल Google Maps चं 'हे' फिचर; असं करा अॅक्टिव्हेट
- Nokia चा ट्रिपल धमाका! किफायतशीर किंमतीतील 3 स्वस्त स्मार्टफोन; रियलमी-रेडमीच्या अडचणींत वाढ