‘या’ दिवशी होईल बहुप्रतीक्षित Asus 8Z ची भारतात एंट्री; छोट्या आकारात मोठ्या धमाक्याची तयारी
By सिद्धेश जाधव | Published: February 25, 2022 07:56 PM2022-02-25T19:56:00+5:302022-02-25T19:56:08+5:30
Asus 8Z स्मार्टफोन भारतात Qualcomm Snapdragon 888 चिपसेट, 64MP कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.
Asus अखेरीस भारतात आपली फ्लॅगशिप Asus 8Z सीरीज सादर करणार आहे. गेल्यावर्षी जुलैमध्ये घोषणा केल्यानंतर आता कंपनीनं या सीरिजच्या पहिल्या फोनच्या लाँचची माहिती दिली आहे. Asus 8Z स्मार्टफोन भारतात 28 फेब्रुवारी 2022 ला लाँच होईल. हा इव्हेंट युट्युबवर थेट प्रक्षेपित केला जाईल, अशी माहिती आसूसनं दिली आहे. लाँचनंतर हा मोबाईल Flipkart वरून विकत घेता येईल.
Asus 8Z स्पेसिफिकेशन्स
Asus 8Z स्मार्टफोनमध्ये 5.9 इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये Snapdragon 888 5G SoC सह Adreno 660 GPU देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 16GB पर्यंतच्या रॅम आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन Android 11 वर आधारित ZenUI 8 कस्टम स्किन वर चालतो.
Asus 8Z मधील ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा आणि 12MP चा अल्टा-वाईड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. हा आसुस फोन 12MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
- 1TB मेमरी, 16GB रॅम! एक नंबर स्पेसिफिकेशन्सनी ठासून भरलेला Nubia Z40 Pro लाँच; इतकी आहे किंमत
- Amazon Sale: AC, Cooler, फ्रिजच्या किंमती देखील देणार थंडावा; स्वस्तात करा उन्हाळ्याची तयारी
- OPPO ची कमाल! 64MP कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जिंगसह आला Oppo Find X5 Lite; इतकी आहे किंमत