विद्यार्थ्यांची चांदी! 25 हजारांच्या आत Asus चा नवा लॅपटॉप; Intel प्रोसेसरसह Windows 11 सपोर्ट  

By सिद्धेश जाधव | Published: April 28, 2022 05:23 PM2022-04-28T17:23:57+5:302022-04-28T17:25:50+5:30

Asus ने विद्यार्थ्यांसाठी खास नवीन लॅपटॉप लाँच केला आहे, ज्यात Intel Celeron प्रोसेसरसह Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.  

Asus Durable Laptops Launched With Intel CPU And Windwos 11 Support   | विद्यार्थ्यांची चांदी! 25 हजारांच्या आत Asus चा नवा लॅपटॉप; Intel प्रोसेसरसह Windows 11 सपोर्ट  

विद्यार्थ्यांची चांदी! 25 हजारांच्या आत Asus चा नवा लॅपटॉप; Intel प्रोसेसरसह Windows 11 सपोर्ट  

Next

Asus नं विद्यार्थ्यांच्या गरजा आणि बजेट लक्षात ठेऊन लॅपटॉप्सची एक नवीन सिरीज सादर केली आहे. कंपनीच्या Asus BR1100 सीरीजमध्ये बजेट फ्रेंडली लॅपटॉप लाँच करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात लेटेस्ट Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. तर प्रोसेसिंगसाठी कंपनीनं Intel प्रोसेसरचा वापर केला आहे. याचे स्पेसिफिकेशन्स एंट्री लेव्हल आहेत त्यामुळे जर तुम्हाला हेवी गेमिंग किंवा एडिटिंग सारखे जास्त पावर लागणारी कामं करणार नसाल तर हा उत्तम पर्याय ठरू शकतो.  

फीचर्स 

ASUS BR1100 लॅपटॉपमध्ये 11.6-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फ्लिप करून टॅबलेट प्रमाणे देखील वापरता येतो. यात Intel N4500 ड्युअल-कोर प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. सोबत 128GB NVMe SSD देण्यात आला आहे जी 2TB पर्यंत अपग्रेड करता येईल. सोबत 4GB DDR4 RAM देण्यात आला आहे.  

या लॅपटॉपमध्ये AI-पावर्ड नॉइज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हे 3DNR HD कॅमेऱ्यासह येतो. या सीरीजमध्ये फुल-साइज पोर्ट अर्थात USB-C, HDMI आणि RJ-45 पोर्ट्स देण्यात आले आहेत. या सीरीजमध्ये 3-सेल 42Wh बॅटरी देण्यात आली आहे जी 10-तासांचा बॅटरी बॅकअप देते. 

किंमत आणि उपलब्धता 

Asus BR1100CKA ची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर टच व्हेरिएंटचा मॉडेल नंबर ASUS BR1100FKA आहे. जो 29,999 रुपयांमध्ये विकला जाईल. यांची विक्री Flipkart, Amazon आणि Asus च्या अधिकृत वेबसाईटवरून करण्यात येईल. 

Web Title: Asus Durable Laptops Launched With Intel CPU And Windwos 11 Support  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.