सर्वात शक्तिशाली गेमिंग फोनचं पुढील महिन्यात लाँचिंग; ASUS ROG Phone 6 च्या डिजाइनचा खुलासा
By सिद्धेश जाधव | Published: June 25, 2022 11:46 AM2022-06-25T11:46:51+5:302022-06-25T11:47:04+5:30
ASUS ROG Phone 6 स्मार्टफोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे, हा लेटेस्ट प्रोसेसरसह लाँच होईल.
ASUS ROG Phone सीरिज मोबाईल गेमर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. या लाईनअपमधील स्मार्टफोन्स मोबाईल गेमिंगसाठी आवश्यक असलेल्या फीचर्ससह बाजारात येतात. त्यामुळे चाहते गेले कित्येक दिवस ASUS ROG Phone 6 ची वाट बघत आहेत. आता या स्मार्टफोनची डिजाईन टेना सर्टिफिकेशन साईटवर दिसली आहे. तसेच काही स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील मिळाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार हा फोन 5 जुलैला आसूसच्या होम मार्केट तैवानसह चीन आणि यूएसमध्ये अधिकृतपणे लाँच केला जाईल. या फोन सीरीजमधील एक व्हेरिएंट नुकताच TENAA certification वर दिसला आहे. टेना सर्टिफिकेशनवरून ASUS ROG Phone 6 च्या डिजाइनची माहिती मिळाली आहे.
Asus ROG Phone 6 ची डिजाइन
आगामी आसूस गेमिंग फोनच्या डिजाईनमध्ये जास्त बदल केलेला दिसत नाही. सर्टिफिकेशननुसार या फोनच्या फ्रंटला एक पंच होल डिजाईन असलेला डिस्प्ले देण्यात येईल. हे पंच होल कटआऊट डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी देण्यात येईल. फोनच्या मागे वर डावीकडे हॉरीजोन्टल शेपमध्ये कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे, ज्यात ट्रिपल कॅमेरा सेटअप असू शकतो. ROG Phone 6 बॅक पॅनलवर खालच्या बाजूला ROG logo सह टेनसेंट गेम्सची ब्रँडिंग देखील दिसत आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन मिळू शकतं.
यंदाही आगामी ROG Phone सीरीजमध्ये ROG Phone 6, ROG Phone 6 Pro आणि ROG Phone 6 Ultimate असे तीन डिवाइस सादर केले जाऊ शकतात. या तिन्ही हँडसेटमध्ये Snapdragon 8+ Gen 1 SoC या शक्तिशाली प्रोसेसरची पावर मिळू शकते. 5 जुलैला जागतिक बाजारात हा डिवाइस लाँच होईल, परंतु भारतातील उपलब्धतेची माहिती मात्र मिळाली नाही.