18GB रॅमसह बाजारात येणार जबरदस्त ASUS ROG Phone 5S; स्पेसिफिकेशन्स झाले लीक
By सिद्धेश जाधव | Published: August 10, 2021 06:39 PM2021-08-10T18:39:05+5:302021-08-10T18:42:03+5:30
ROG Phone 5S Specs: ASUS ROG Phone 5S स्मार्टफोन हा ROG Phone 5 स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन असेल. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्लस प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
ASUS चा नवीन गेमिंग स्मार्टफोन लवकरच बाजारात दाखल होऊ शकतो. कंपनी ASUS ROG Phone 5S सादर करण्याची तयारी करत आहे. हा स्मार्टफोन ROG Phone 5 चा अपग्रेड व्हर्जन असू शकतो. यात नवीन प्रोसेसरसह इतर अपग्रेडेड स्पेसिफिकेशन्स दिले जाऊ शकतात. प्रसिद्ध टिप्सटर मुकुल शर्माने एका फोटो ट्विटरवर शेयर केला आहे. हा फोटो ASUS ROG Phone 5S च्या रिटेलर लिस्टिंगचा आहे. या फोटोमधून या फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.
ASUS ROG Phone 5S चे लीक स्पेसिफिकेशन्स
समोर आलेल्या लिक्सनुसार, ASUS ROG Phone 5S मध्ये 144Hz रिफ्रेश रेट असलेला ओएलईडी डिस्प्ले देण्यात येईल. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 888 प्लस प्रोसेसर देण्यात येईल. या फोनमध्ये 6000mAh ची दमदार बॅटरी मिळेल, ही बॅटरी 65W चार्जिंगला सपोर्ट करू शकते. हा फोन 12GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 18GB रॅम + 256GB स्टोरेज अश्या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ASUS ROG Phone 5S स्मार्टफोनबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही
ASUS ROG Phone 5 चे स्पेसिफिकेशन्स
ASUS ROG Phone 5S स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसच्या सुरक्षेसह सादर करण्यात आला आहे. या गेमिंग फोनमध्ये प्रोसेसिंगसही दमदार स्नॅपड्रॅगन 888 एसोसी देण्यात आली आहे. यात 16GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. पावर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ASUS ROG Phone 5S मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 64MP + 13MP + 5MP असे तीन सेन्सर मिळतात. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 24MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.