अस्सल गेमिंगसाठी Asus ROG आला; फ्लिपकार्टवर उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 11:01 AM2018-12-03T11:01:24+5:302018-12-03T11:01:40+5:30

ROG म्हणजे रिपब्लिक ऑफ गेमर्स असे या फोनच्या नावामागचे गमक आहे. हा फोन आंतरराष्ट्रीय बाजारात याआधीच लाँच करण्यात आला होता. 

Asus ROG smartphone launch for genuine gamer; Available on Flipkart | अस्सल गेमिंगसाठी Asus ROG आला; फ्लिपकार्टवर उपलब्ध

अस्सल गेमिंगसाठी Asus ROG आला; फ्लिपकार्टवर उपलब्ध

Next

मुंबई : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी असूसने गेम खेळणाऱ्यांसाठी दमदार मोबाईल भारतात लाँच केला आहे. Asus ROG असे या फोनचे नाव असून या फोनची गेम प्रेमी आतुरतेने वाट पाहत होते. महत्वाचे म्हणजे या फोनमध्ये जगातील पहिले 3D व्हेपर चेंबर कुलिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे. याच बरोबर या फोनमध्ये काही अन्यही फिचर्स आहेत. 


ROG म्हणजे रिपब्लिक ऑफ गेमर्स असे या फोनच्या नावामागचे गमक आहे. हा फोन आंतरराष्ट्रीय बाजारात याआधीच लाँच करण्यात आला होता. 


Asus ROG हा फोन भारतात नुकताच लाँच करण्यात आला. हा फोन फ्लिपकार्टद्वारे खरेदी केला जाऊ शकतो. भारतात या फोनची किंमत 69,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन आंतरराष्ट्रीय किंमतीपेक्षा 14 हजार रुपयांनी स्वस्त ठेवण्यात आली आहे. लवकरच कंपनी या फोनच्या अॅक्सेसरीज बाजारात आणणार आहे. 


हा फोन केवळ गेम खेळणाऱ्यांसाठी असल्याने गेमिंगसाठीचे सर्व फिचर्स या फोनमध्ये देण्यात आले आहेत. यामुळे कॅमेरा किंवा इतर फिचर्ससाठी हा फोन घेणाऱ्यांनी गेमची आवड असेल तरच याकडे वळलेले बरे. Asus ROG या फोनमध्ये 6 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनचे रिझोल्युशन 1080x2160 पिक्सल आहे. तसेच प्रोसेसर क्वालकॉम स्नैपड्रैगन 845 हा सध्याचा लेटेस्ट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी अॅड्रिनो 630 जीपीयू  देण्य़ात आला आहे. याचसोबत हेवी गेमसाठी 8 जीबी रॅम आणि 128 जीबी रोम देण्यात आलेली आहे. जी 512 जीबी पर्यंत वाठविली जाऊ शकते. 

कॅमेरा 12 मेगापिक्सल पाठीमागे आणि 8 मेगापिक्सल सेल्फीसाठी देण्यात आलेला आहे. 4000 एमएएचची बॅटरीही देण्यात आलेली आहे. तसेच विविध गेम खेळण्यासाठी बरेच सेन्सर देण्यात आलेले आहेत. फिंगरप्रिंट सेन्सरसह फोन क्विक चार्ज 3.0 ला सपोर्ट करतो. 

Web Title: Asus ROG smartphone launch for genuine gamer; Available on Flipkart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.