अबब! तब्बल 48GB रॅम सपोर्टसह Asus चा दणकट लॅपटॉप आला भारतात; विंडोज 11 सह वेगवान डिस्प्ले
By सिद्धेश जाधव | Published: April 9, 2022 03:01 PM2022-04-09T15:01:45+5:302022-04-09T15:02:28+5:30
Asus ROG Zephyrus M16 2022 Edition लॅपटॉप भारतात लाँच करण्यात आला आहे. यात 48GB पर्यंत रॅम वाढवता येतो.
Asus ROG Zephyrus M16 2022 Edition लॅपटॉप याआधी CES 2022 मध्ये सादर करण्यात आला होता. आता याचं पदार्पण भारतात झालं आहे. यात लेटेस्ट Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम, 32GB रॅम, 16 इंचाचा डिस्प्ले आणि 12th Gen Intel Core i9-12900H प्रोसेसर मिळतो. हा गेमिंग लॅपटॉप असल्यामुळे यात बिल्ट-इन कुलिंग सिस्टम मिळते.
Asus ROG Zephyrus M16 2022 Edition चे स्पेसिफिकेशन्स
आसूसच्या या नव्या लॅपटॉपमध्ये 12th generation Intel Core i9 (12900H) प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 32GB DDR5 RAM मिळतो. हा रॅम 48GB पर्यंत वाढवता येईल. लॅपटॉप विकत घेतल्यावर 2TB स्टोरेज मिळते, जी 4TB पर्यंत वाढवता येईल. तसेच या लॅपटॉप Nvidia GeForce RTX 3080Ti ग्राफिक्स कार्ड देण्यात आलं आहे. कंपनीनं यात Windows 11 Home ऑपरेटिंग सिस्टम दिली आहे.
Asus च्या या लॅपटॉपमध्ये 16-इंचाचा मोठा WQXGA डिस्प्ले 2560 x 1600 पिक्सल रिजोल्यूशनसह मिळतो. हा डिस्प्ले 165Hz रिफ्रेश रेट आणि 500 nits पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. यात MUX Switch, Dolby Atmos असलेले 6 स्पिकर्स आणि 3 माईक देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6E, Bluetooth v5.2, Thunderbolt 4 पोर्ट, USB Type-C Power पोर्ट्स, HDMI 2.0b, 3.5mm ऑडियो जॅक, दोन USB 3.2 Gen 2 Type-A पोर्ट्स आणि RJ45 LAN पोर्ट देण्यात आला आहे. हा एक गेमिंग लॅपटॉप असल्यामुळे यात लिक्विड मेटल कम्पाउंड कुलिंग सिस्टम सीपीयूचं तापमान कमी ठेवते. असूसचा हा सिंगल चार्जमध्ये 10 तास वापरता येतो.
किंमत
Asus ROG Zephyrus M16 2022 Edition लॅपटॉप तुम्ही 1,79,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. याची विक्री अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, आसूसची वेबसाईट आणि ऑफलाइन स्टोरवर सुरु झाली आहे.