भन्नाट टच स्क्रीन लॅपटॉप! स्वस्तात मोठा डिस्प्ले, डिटॅचेबल कीबोर्ड आणि स्टायलस सपोर्ट
By सिद्धेश जाधव | Published: March 4, 2022 04:11 PM2022-03-04T16:11:20+5:302022-03-05T11:39:36+5:30
ASUS Vivobook 13 Slate 2 इन 1 लॅपटॉप भारतात लाँच झाला आहे. यात मोठ्या डिस्प्लेसह Windows 11 सपोर्ट देण्यात आला आहे.
ASUS Vivobook 13 Slate भारतात 2 इन 1 कनवर्टेबल नोटबुक सादर केला आहे. हा जगातील पहिला 13.3 इंचाचा OLED Windows डिटॅचेबल लॅपटॉप आहे. यात Dolby Vision सपोर्ट, ASUS Pen 2.0 Stylus, डिटॅचेबल फुल साइज कीबोर्ड आणि डिटॅचेबल हिंग्स सह सादर केला गेला आहे. याची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन खाली से जानें.
ASUS Vivobook 13 Slate ची किंमत
या आसूस लॅपटॉपच्या 4GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 45,900 रुपये आहे. फिंगरप्रिंट सेन्सर, स्लीव स्टॅन्ड आणि स्टायलस होल्डर इत्यादी मॉडेल 57,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर टॉप-एन्ड 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 62,900 रुपये आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह ऑफलाईन स्टोर्सवरून विकत घेता येईल.
ASUS Vivobook 13 Slate चे स्पेसिफिकेशन्स
ASUS Vivobook 13 Slate मध्ये 13.3 इंचाचा OLED टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 16:9 अस्पेक्ट रेशिय, 1920×1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 550nits पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. सोबत TUV Rheinland सर्टिफिकेशन, Dolby Vision सपोर्ट, Corning Gorilla Glass ची सुरक्षा, आणि अँटी फिंगरप्रिंट कोटिंग देखील मिळते.
या लॅपटॉपमध्ये नवीनतम इंटेल पेंटियम सिल्वर N6000 क्वॉड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 8GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 256GB PCIe 3.0 SSD मिळतो. हा लॅपटॉप Windows 11 वर चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. तर मागे 13MP चा रियर कॅमेरा आहे.
टॅबलेट मोडमध्ये नोट्स घेण्यासाठी ASUS Pen 2.0 सपोर्ट मिळतो. हा ASUS लॅपटॉप स्लिम आणि डिटॅचेबल कीबोर्डसह येतो. यात चार बिल्ट-इन स्पिकर्स मिळतात. सुरक्षेसाठी यात फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. डिवाइसच्या वजन 785 ग्राम आहे आणि हा लॅपटॉप 7.9mm जाड आहे.
हे देखील वाचा:
- Samsung बाजारपेठेत उडवणार खळबळ; 20 हजारांच्या बजेटमध्ये येतोय अॅडव्हान्स फीचर्स असलेला फोन
- टीव्हीच्या खरेदीवर ‘बिग बचत’! 6 हजारांमध्ये 40-इंचाचा Smart TV, उरले फक्त 3 दिवस
- 15 हजारांच्या आत Motorola ची कमाल; जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह आला Moto G22