Asus ची कमाल! कंप्यूटरची ताकद आणि टॅबलेटची लवचिकता; टचस्क्रीन डिस्प्लेसह शानदार लॅपटॉपची एंट्री
By सिद्धेश जाधव | Published: March 21, 2022 07:42 PM2022-03-21T19:42:58+5:302022-03-21T19:43:25+5:30
Asus ZenBook 14 Flip OLED मध्ये 14 इंचाचा डिस्प्ले 2.8K (2,880x1,800 पिक्सल) रिजोल्यूशनसह मिळतो. असा डिस्प्ले असलेला हा जगातील सर्वात स्लिम लॅपटॉप आहे.
Asus ZenBook 14 Flip OLED लॅपटॉप भारतात लाँच झाला आहे. हा 2 इन 1 लॅपटॉप कंपनीनं शानदार 2.8K OLED डिस्प्लेसह सादर केला आहे. असा डिस्प्ले असलेला हा जगातील सर्वात स्लिम लॅपटॉप आहे. यातील 360 डिग्री रोटेशनमुळे तुम्ही याचा वापर टॅबलेट म्हणून देखील करू शकता. या टचस्क्रीन लॅपटॉपमधील ट्रॅकपॅडचं रूपांतरण व्हर्च्युअल नंबरपॅडमध्ये करता येतं.
Asus ZenBook 14 Flip OLED चे स्पेसिफिकेशन्स
Asus ZenBook 14 Flip OLED मध्ये नावाप्रमाणे 14 इंचाचा डिस्प्ले मिळतो. जो 2.8K (2,880x1,800 पिक्सल) रिजोल्यूशन, टच, आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं अॅल्यूमीनियम अलॉयचा वापर लिड आणि चेसिसमध्ये केला आहे. यात फुल साइज बॅकलिट कीबोर्ड मिळतो, तसेच फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा पण आहे. या आसूस लॅपटॉपमध्ये हरमन-कार्डन साउंड देण्यात आला आहे.
Asus ZenBook 14 Flip OLED लॅपटॉप मायक्रोसॉफ्टच्या लेटेस्ट विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात 63Wh की बॅटरी देण्यात आली आहे, जी 100W यूएसबी टाइप-सी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीनं यात प्रायव्हसी शटरसह HD वेबकॅम दिला आहे. कनेक्टिविटीसाठी यात ड्युअल-बँड वाय-फाय 6, ब्लूटूथ v5.0, दोन यूएसबी 3.2 जेन 2 टाइप-सी पोर्ट, एक यूएसबी 3.2 जेन 2 टाइप-ए पोर्ट, एक एचडीएमआय 2.0, मायक्रोएसडी कार्ड रीडर आणि एक 3.5 मिमी ऑडियो जॅक मिळतो.
Asus ZenBook 14 Flip OLED ची किंमत
या लॅपटॉपच्या AMD Ryzen 5 5600H प्रोसेसर, 16 जीबी रॅम आणि 512GB SSD व्हर्जनची किंमत 91,990 रुपये आहे. तर AMD Ryzen 7 5800H प्रोसेसर, 16GB रॅम आणि 1TB स्टोरेज मॉडेल 1,12,990 रुपयांमध्ये मिळेल. सर्वात मोठ्या AMD Ryzen 9 5900HX प्रोसेसर, 16GB रॅम आणि 1TB SSD असेलेल्या व्हेरिएंटसाठी 1,34,990 रुपये द्यावे लागतील. हा लॅपटॉप Amazon, Flipkart आणि आसुसच्या स्टोर्सवरून विकत घेता येईल.