32GB रॅमसह Asus नं लाँच केला स्टायलिश लॅपटॉप; फीचर्स पाहून विकत घेण्याचा मोह होईल  

By सिद्धेश जाधव | Published: May 13, 2022 03:32 PM2022-05-13T15:32:09+5:302022-05-13T15:32:32+5:30

ASUS नं भारतात ZenBook 14X OLED Space Edition आणि ZenBook 14 OLED असे दोन लॅपटॉप सादर केले आहेत.  

Asus Zenbook 14X OLED Space Edition And Zenbook 14 OLED Laptop launched In India Check Price  | 32GB रॅमसह Asus नं लाँच केला स्टायलिश लॅपटॉप; फीचर्स पाहून विकत घेण्याचा मोह होईल  

32GB रॅमसह Asus नं लाँच केला स्टायलिश लॅपटॉप; फीचर्स पाहून विकत घेण्याचा मोह होईल  

googlenewsNext

ASUS नं भारतात ZenBook 14X OLED Space Edition आणि ZenBook 14 OLED हे दोन लॅपटॉप सादर केले आहेत. ASUS ZenBook 14X OLED स्पेस एडिशनमध्ये दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत. हा कंपनीच्या रौप्यमहोत्सवाच्या निम्मिताने यंदाच्या CES मध्ये सादर करण्यात आला होता. आता या दोन्ही लॅपटॉप्सची एंट्री भारतात झाली आहे.  

ASUS ZenBook 14X OLED Space Edition 

यात 14 इंचाचा OLED टचस्क्रीन डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 92 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्योसह देण्यात आला आहे. तर यातील दुसरा डिस्प्ले लॅपटॉपच्या लीडवर देण्यात आला आहे. हा एक 3.5 इंचाचा OLED कम्पॅनियन जेनव्हिजन मोनोक्रोम डिस्प्ले आहे, जो अ‍ॅनिमेशन आणि टेक्स्ट दाखवू शकतो.  

Asus ZenBook 14X OLED Space Edition मध्ये 14 इंचाचा 2.8K (2,880x1,800 पिक्सल) टचस्क्रीन OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो HDR कंटेंट आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात i5-12500H, i7-12700H, आणि i9-12900H ची प्रोसेसिंग पावर मिळते. सोबत इंटेल आयरिश एक्सई ग्राफिक्स आहेत. लॅपटॉप विंडोज 11 होम वर चालतो. सोबत 32GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 1TB पर्यंत M.2 PCIe Gen 4 SSD स्टोरेज मिळते.  

Asus ZenBook 14X OLED Space Edition मध्ये 720p रिजोल्यूशन असलेला वेबकॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल-बँड वाय-फाय 6ई, ब्लूटूथ 5.2, दोन थंडरबोल्ट 4 पोर्ट, एक यूएसबी 3.2 जेन 2 टाइप-ए पोर्ट, एक एचडीएमआय 2.0 पोर्ट, एक मायक्रोएसडी कार्ड रीडर आणि एक 3.5 मिमी ऑडियो जॅक आहे. यातील 63Wh लिथियम पॉलीमर बॅटरी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  ASUS ZenBook 14X OLED स्पेस एडिशनची किंमत 1,14,990 रुपयांपासून सुरु होते.  

ASUS ZenBook 14 OLED 

ZenBook 14 OLED मध्ये 14-इंचाचा 2.8K OLED नॅनोएज डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. जो 16:10 अस्पेक्ट रेशियो, 100% DCI-P3 कलर गामुट आणि 550-नाईट ब्राईटनेसला सपोर्ट करतो. डिवाइस 12th Gen Intel Core i5-1240P किंवा Intel Core i7-1260P प्रोसेसरसह विकत घेता येईल. सोबत 16GB LPDDR5 रॅम आणि 512GB PCIe 4.0 परफॉर्मन्स SSD मिळेल.  

यात स्टीरियो स्पिकर आणि स्मार्ट एएमपी मिळते. कंपनीनं यात प्रायव्हसी शटरसह एक 720p वेब कॅमेरा दिला आहे. हा लॅपटॉप विंडोज 11 होम ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. पावर बॅकअपसाठी 65W फास्ट चार्जिंगसह 75WHrs ची बॅटरी देण्यात आली आहे. i5 व्हेरिएंटची किंमत 89,990 रुपये आहे, तर i7 मॉडेल 1,04,990 रुपयांमध्ये मिळेल.  

Web Title: Asus Zenbook 14X OLED Space Edition And Zenbook 14 OLED Laptop launched In India Check Price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.