ASUS ZenFone 8 लवकरच येणार भारतात; Xiaomi-Realme ला देणार का मात?
By सिद्धेश जाधव | Published: July 9, 2021 04:41 PM2021-07-09T16:41:37+5:302021-07-09T16:41:51+5:30
Asus Zenfone 8 India launch: आसूस इंडिया बिजनेस हेड दिनेश शर्मा यांनी एका ट्वीटमध्ये खुलासा केला आहे कि आसुस टीम जेनफोन 8 सीरिज भारतात लाँच करण्यासाठी काम करत आहे.
Asus ने मे महिन्यात जागतिक बाजारात जेनफोन 8 सीरीजमध्ये आसुस जेनफोन 8 आणि जेनफोन 8 फ्लिप हे दोन लाँच केले होते. तेव्हाच हे स्मार्टफोन भारतात सादर केले जाणार होते, परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे Zenfone 8 सीरीजचा लाँच लांबला. आता कंपनी भारतात Asus 8Z (Zenfone 8) सीरीजचा लाँच जवळ आहे. ही माहिती आसुस इंडियाचे बिजनेस हेड दिनेश शर्मा यांनी दिली आहे.
आसूस इंडिया बिजनेस हेड दिनेश शर्मा यांनी एका ट्वीटमध्ये खुलासा केला आहे कि आसुस टीम जेनफोन 8 सीरिज भारतात लाँच करण्यासाठी काम करत आहे आणि लवकरच भारतात जेनफोन 8 सीरीजची अधिकृत लाँच डेट सांगितली जाईल. जागतिक बाजारात जेनफोन 8 नावाने लाँच झालेली ही सीरिज भारतात 8Z नावाने लाँच केली जाईल आणि आसूस इंडियाच्या वेबसाईटवर या सीरिजचे पेज लाईव्ह करण्यात आले आहे.
ASUS ZenFone 8 स्पेसिफिकेशन्स
ASUS ZenFone 8 स्मार्टफोनमध्ये 5.9 इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये Snapdragon 888 5G SoC सह Adreno 660 GPU देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 16GB पर्यंतच्या रॅम आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन Android 11 वर आधारित ZenUI 8 कस्टम स्किन वर चालतो. ZenFone 8 मधील ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा आणि 12MP चा अल्टा-वाईड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. हा आसुस फोन 12MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.
ASUS ZenFone 8 Flip चे स्पेसिफिकेशन्स
ASUS ZenFone 8 Flip मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये Snapdragon 888 5G SoC सह Adreno 660 GPU मिळतो. हा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनमध्ये Android 11 आधारित ZenUI 8 आहे. ZenFone 8 Flip मध्ये फ्लिप कॅमेरा मोड्यूलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64MP चा मुख्य सेन्सर OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 8MP टेलीफोटो कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. ASUS ZenFone 8 Flip मध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.