Asus Zenfone Max M1 आणि Lite L1 भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 04:38 PM2018-10-17T16:38:13+5:302018-10-17T16:40:36+5:30

ASUS कंपनीने भारतात दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात ASUS कंपनीने Asus Zenfone Max M1  (ZB556KL) आणि Lite L1 (ZA551KL) स्मार्टफोन लाँच केले. हे दोन्ही स्मार्टफोन बजेटमधील आहेत.

Asus ZenFone Max M1 (ZB556KL), ZenFone Lite L1 (ZA551KL) Launched in India | Asus Zenfone Max M1 आणि Lite L1 भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स...

Asus Zenfone Max M1 आणि Lite L1 भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स...

Next

नवी दिल्ली : ASUS कंपनीने भारतात दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात ASUS कंपनीने Asus Zenfone Max M1  (ZB556KL) आणि Lite L1 (ZA551KL) स्मार्टफोन लाँच केले. हे दोन्ही स्मार्टफोन बजेटमधील आहेत.

ऑनलाइन संकेतस्थळ फ्लिपकार्टवर लवकरच Asus Zenfone Max M1 आणि Lite L1 स्मार्टफोन उपलब्ध होणार आहेत. फिल्पकार्टच्या फेस्टिव्ह धमाका सेलमध्ये या स्मार्टफोनची विक्री केली जाणार आहे. तसेच, दोन्ही स्मार्टफोनसोबत जिओ युजर्संना 2200 रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे. याशिवाय, 50 जीबीपर्यंत एक्स्ट्रा डेडा मिळणार आहे. स्मार्टफोनच्या लाँचिंग ऑफरमध्ये मोबाइल प्रोटेक्शन फक्त 99 रुपयांना दिले जाणार आहे. दरम्यान,  Asus Zenfone Max M1 आणि Lite L1 स्मार्टफोनमध्ये अनेक अपडेट फीचर्स दिले आहेत. दोन्ही स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉन फीचर, ऑडिओ विजार्ड देण्यात आले आहे. तसेच, ऑफरेटिंग सिस्टिम अँड्राईड ओरिओ आहे.  

दरम्यान, Huawei कंपनीचा उप ब्रँड असलेल्या Honor ने काल आपला नवीन स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये आणला आहे.  Honor 8X हा स्मार्टफोन कंपनीने भारतात लाँच केला आहे. गेल्या महिन्यात कंपनीने चीनमध्ये हा स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीने तीन व्हेरियंटमध्ये Honor 8X स्मार्टफोन ग्राहकांना मिळणार आहे. तसेच, या स्मार्टफोनची किंमत व्हेरियंटनुसार आहे. सुरुवातीची किंमत 14,999 रुपये इतकी आहे.

Web Title: Asus ZenFone Max M1 (ZB556KL), ZenFone Lite L1 (ZA551KL) Launched in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.