Google वर 'या' तीन गोष्टी सर्च कराल तर थेट तुरुंगात जाल, एक चूक पडेल महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 09:06 AM2022-05-11T09:06:55+5:302022-05-11T09:07:21+5:30

Google Search: आज आपल्याला इंटरनेटवर काहीही शोधायचं झालं तर आपण आपसुकच Google वर जातो कारण इथं आपल्याला आवश्यक माहिती क्षणार्धात मिळते.

Avoid Searching These 3 Things On Google Search Else Might Face Jail | Google वर 'या' तीन गोष्टी सर्च कराल तर थेट तुरुंगात जाल, एक चूक पडेल महागात!

Google वर 'या' तीन गोष्टी सर्च कराल तर थेट तुरुंगात जाल, एक चूक पडेल महागात!

googlenewsNext

Google Search: आज आपल्याला इंटरनेटवर काहीही शोधायचं झालं तर आपण आपसुकच Google वर जातो कारण इथं आपल्याला आवश्यक माहिती क्षणार्धात मिळते. पण Google वर काही गोष्टींचा शोध घेणं तुम्हाला महागात पडू शकते. हो, अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही Google वर सर्च करू शकत नाही कारण असं करणं हा गुन्हा आहे. ज्यामुळे तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या चुकूनही गुगलवर सर्च करू नयेत, याची माहिती जाणून घेऊयात.

१. चाइल्ड पॉर्नोग्राफी
चाइल्ड पॉर्नोग्राफी याचा अर्थ असा आहे की लहान मुलांशी संबंधित पोर्नोग्राफिक माहिती गुगलवर सर्च करणं तुम्हाला खूप महागात पडू शकतं. केंद्र सरकारनं याबाबत कठोर कायदा केला आहे, ज्यामाध्यमातून तुम्हाला पॉस्को कायद्यांतर्गत तुरुंगाची हवा खावी लागू शकते. गुगलवर यासंदर्भात काहीही सर्च करताना पकडले गेलात तर तुम्हाला ५ ते ७ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

२. बॉम्ब कसा बनवावा
तुम्ही चुकूनही बॉम्ब कसा बनवायचा हे गुगलवर सर्च केले तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. असं केल्यानं तुम्ही सुरक्षा एजन्सीच्या रडारवर असाल आणि त्यानंतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

३. गर्भपाताबद्दल सर्च करणं पडेल महागात
जर तुम्ही गुगलवर गर्भपाताशी संबंधित माहिती शोधली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. कारण केंद्र सरकारनं यासाठी कठोर कायदे केले आहेत. डॉक्टरांच्या मान्यतेनंतरच हे शक्य आहे, म्हणून पुढच्या वेळी यासंदर्भात काहीही शोधण्यापूर्वी विचार करा.

Web Title: Avoid Searching These 3 Things On Google Search Else Might Face Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.