अलर्ट! WhatsApp वर येणारा 'हा' १ मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला पाठवू शकतो तुरुंगात, चुकूनही पाहू नका...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 02:31 PM2023-01-13T14:31:32+5:302023-01-13T14:31:58+5:30
WhatsApp वापरताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना अनेकदा युझरकडून चुका होत असतात.
नवी दिल्ली-
WhatsApp वापरताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना अनेकदा युझरकडून चुका होत असतात. पण एक चूक किती महागात पडू शकते याचाही युझरला अंदाज नसतो. त्यामुळे WhatsApp बाबतही वापर करताना काळजी बाळगणं महत्वाचं आहे. व्हॉट्सअॅपवर अशाच काही व्हिडिओ शेअर किंवा फॉरवर्ड करणं किती महागात पडू शकतं याची माहिती आपण आज घेणार आहोत.
Whatsapp वापरत असताना तुम्ही पोर्नोग्राफी असलेला कोणताही व्हिडिओ शेअर करणं टाळावं. विशेषत: चाइल्ड पोर्नोग्राफी हा असा विषय आहे, ज्यावर तुम्ही तुरुंगातही जाऊ शकता. कारण असे करणे कायद्याच्या गुन्ह्याच्या श्रेणीत येतं. जेव्हा तुम्हाला असा व्हिडिओ मिळेल तेव्हा स्थानिक पोलिसांना त्याची माहिती द्या. अनेक वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, जे नंतर खूप त्रासदायक ठरू शकतं.
Fake News-
फेक न्यूज शेअर करणेही तुम्हाला महागात पडू शकते. जर तुम्हाला असा कोणताही व्हिडीओ प्राप्त झाला ज्यामध्ये तुमच्यासोबत चुकीची किंवा खोटी बातमी शेअर केली गेली असेल तर तुम्ही तो त्वरित हटवा. तसेच, तुम्ही ते अजिबात फॉरवर्ड करू नये. कारण असे केल्यास कायद्याच्या कचाट्यात सापडू शकते. कारण खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपही सतत काम करत आहे.
परवानगीशिवाय व्हिडिओ शेअर करणे
जर तुम्ही व्हॉट्सअॅपवर एखाद्याचा खासगी व्हिडिओ शेअर केला तर महागात पडू शकतं. कारण असे करणं देखील बेकायदेशीर मानलं जातं. म्हणूनच जर तुम्हाला एखाद्याचा व्हिडिओ आला असेल तर तो असा शेअर करू नये. विशेषत: एक व्हिडिओ ज्यावर कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणाचा खासगी व्हिडिओ येतो तेव्हा तो त्वरित हटवला पाहिजे. व्हिडीओ शेअर करण्यापूर्वी थोडी काळजी घ्यावी.