लय भारी! आता गॉगलने अटेंड करा कॉल अन् आवडती गाणीही ऐका; जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 04:31 PM2021-03-11T16:31:48+5:302021-03-11T16:34:58+5:30

Anzu Smart Glasses : गॉगल राउंड आणि रेक्टेंगुलर या दोन आकारांमध्ये डिझाईन करण्यात आला असून तो फक्त काळ्या रंगातच उपलब्ध आहे.

azer anzu smart glasses with built in speakers touch controls and blue light filter launched | लय भारी! आता गॉगलने अटेंड करा कॉल अन् आवडती गाणीही ऐका; जाणून घ्या किंमत

लय भारी! आता गॉगलने अटेंड करा कॉल अन् आवडती गाणीही ऐका; जाणून घ्या किंमत

googlenewsNext

अमेरिकन टेक कंपनी रेजरने नवीन स्मार्ट ग्लास (गॉगल) लाँच केले आहेत. या गॉगलमध्ये बिल्ट इन स्पीकर, टक कन्सोल आणि ब्ल्यू लाइट फिल्टरसारखे एडवान्स फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने या उपकरणाला अंझू (Anzu) स्मार्ट ग्लास असं नाव दिलं आहे. गॉगल राउंड आणि रेक्टेंगुलर या दोन आकारांमध्ये डिझाईन करण्यात आला असून तो फक्त काळ्या रंगातच उपलब्ध आहे. सध्या हा गॉगल केवळ अमेरिकेतच उपलब्ध करून देण्यात आला आहे. या गॉगलची किंमत 199.99 डॉलर (जवळपास 14,600 रुपये ) आहे.

गॉगल मोठ्या, मध्यम आणि छोट्या आकारात उपलब्ध करून देण्यात आला आहे. या गॉगलमध्ये बिल्ट इन स्पीकर्स देण्यात आले आहेत. हे स्पीकर्स 16mm ड्रायव्हरसोबत देण्यात आले आहेत. याशिवाय हा गॉगल ब्ल्यूटूथने कनेक्ट देखील करता येणार आहे. त्यामुळे कॉलही घेता येणार असून संगीताचाही आनंद उपभोगता येणार आहे. एखादं गाणं हे गॉगलच्या मदतीने प्ले आणि पॉज देखील करता येणार आहे. तसेच साँग ट्रॅक बदलता येणार आहे. यामध्ये एडवान्स आय प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. 

गॉगल स्मार्टफोनशी कनेक्ट झाल्यानंतर व्हॉईस असिस्टंटही कंट्रोल करता येणार आहे. या गॉगलमध्ये बिल्ट इन रिचार्जेबल बॅटरीही देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार एका चार्जमध्ये ही बॅटरी पाच तास कार्यरत राहील. गॉगलची घडी घातल्यास (फोल्ड केल्यास) तो आपोआप बंद होतो. हा स्मार्ट गॉगल वॉटरप्रूफ असल्याचेही कंपनीने म्हटलं आहे. तसेच कॉलिंगसाठी यामध्य़े एक मायक्रोफोन देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

OPPO चा नवा फिटनेस बँड लाँच, युजर्सना मिळणार जबरदस्त फीचर; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

ओप्पो कंपनीने भारतात Oppo F19 Pro+ आणि Oppo F19 Pro लाँच केले आहे. तसेच कंपनीने Oppo Band Style फिटनेस ट्रॅकर आणला आहे. यामध्ये 12 वर्कआउट मोड्स, ब्लड ऑक्सिजन सेन्सर आणि रियल टाइम हार्ट रेट मॉनिटरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Oppo Band Style ची किंमत भारतात 2999 रुपये ठेवली आहे. 8 मार्च ते 23 मार्च दरम्यान याला 2799 रुपयात खरेदी करता येऊ शकते. याची विक्री फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आणि ऑफलाइन स्टोर्सवरून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या बँडसाठी तुम्हाला अनेक स्ट्रॅप कलर्स मिळणार आहेत. 

Oppo Band Style चे स्पेसिफिकेशन्स

फिटनेस बँडमध्ये 2.5D कर्व्ड ग्लास प्रोटेक्शन सोबत 1.1 इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. सोबत थ्री अ‍ॅक्सेस एक्सलेरोमीटर, ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर आणि एसपीओटू सेन्सर देण्यात आला आहे. या रिस्टबँडमध्ये युजर्संना ब्लड ऑक्सिजन, हार्ट रेट फीचर मिळणार आहे. यासोबत ओप्पोने यात डेली अ‍ॅक्टिविटी ट्रॅकर, गेट अप रिमाइंडर्स आणि ब्रिदिंग एक्सरसाइजसारखे फीचर्स दिले आहेत. वर्कआउट ट्रेनिंगसाठी यात वर्कआउट मोड्स देण्यात आले आहेत. यात एक खास फॅट बर्न मोड फीचर्स दिले आहे. हे 5 एटीएम रेसिस्टेंट आहे. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

Web Title: azer anzu smart glasses with built in speakers touch controls and blue light filter launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.