ओटीपी शेअर न करताही बँक खात हॅक, सायबर गुन्हेगारांनी नवीन फंडा आणला; वाचा नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 10:02 IST2025-03-01T10:00:51+5:302025-03-01T10:02:06+5:30

सायबर गुन्हेगार आता नव्या फंड्याद्वारे लोकांची बँक खाती खाली करत आहेत. यामुळे आता बँक खाते धारकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

Bank account hacked without sharing OTP, cyber criminals bring new funds; Read what is the real issue? | ओटीपी शेअर न करताही बँक खात हॅक, सायबर गुन्हेगारांनी नवीन फंडा आणला; वाचा नेमकं प्रकरण काय?

ओटीपी शेअर न करताही बँक खात हॅक, सायबर गुन्हेगारांनी नवीन फंडा आणला; वाचा नेमकं प्रकरण काय?

सध्या सायबर गुन्हेगारीची प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लोकांना फसवून त्यांच्याकडून बँक ओटीपी घेतला जातो आणि बँक खाते खाली केले जात आहे. आता सायबर गुन्हेगारांनी आणखी एक फंडा आणला आहे, यामध्ये तुम्हाला ओटीपी विचारला जात नाही. ओटीपी न घेताच तुमचे बँक खाते खाली केले जाते. 

सायबर गुन्हेगारांनी आता पैसे चोरण्यासाठी नवीन फंडे आणले आहेत. त्यांना आता ओटीपी किंवा एटीएम पिनची आवश्यकता नाही. ते आता एक मेसेज पाठवत आहेत.आपल्याला ते मेसेज बँकेकडून आल्यासारखे वाटतात. त्यात बनावट लिंक्स आहेत. त्या लिंकवर कोणी क्लिक करताच, त्यांच्या खात्यातून पैसे चोरीला जातात. यामध्ये OTP ची आवश्यकता नाही.

हे स्कॅमर अनेकदा अशा ठिकाणांहून वैयक्तिक डेटा गोळा करतात तिथे लोकांनी त्यांचे फोन नंबर शेअर केले आहेत. मग ते अलीकडील खरेदीशी संबंधित संदेश पाठवतात. जर कोणी त्या लिंकवर क्लिक केले तर त्यांचे पैसे लगेच जातात.

नवी दिल्लीतील एका २६ वर्षीय महिलेने क्रोमाकडून एचपी लॅपटॉप खरेदी केला. काही दिवसांनी त्यांना एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. यामध्ये त्यांना व्हाउचर जिंकले आहे असे सांगितले.  व्हाउचरचा दावा करण्यासाठी, त्यांना त्यांची वैयक्तिक माहिती एका लिंकवर शेअर करावी लागेल, असे या मेसेजमध्ये म्हटले होते. यामध्ये बँक तपशील देखील दिला होता.

यानंतर या महिलेला या मेसेजचा संशय आला. कारण, मेसेजमध्ये चूक होती. मेसेजमध्ये क्रोमा आणि विजय सेल्स दोघांचाही उल्लेख होता आणि विजय सेल्सकडून खरेदी केल्याबद्दल व्हाउचर जिंकल्याचे म्हटले होते. या चुकीमुळे त्यांच्या थोडे लक्षात आले. यामुळे त्या संभाव्य घोटाळ्यापासून वाचल्या.

फसवणुकीपासून या पद्धतीने सावध रहा

गरज नसलेल्या कॉल आणि मेसेजपासून सावध रहा.

कधीही अनोळखी व्यक्तींसोबत संवेदनशील माहिती शेअर करू नका.

संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका, यामध्ये एखादे मेसेज व्हाउचरचे असतात, सवलत किंवा रोख बक्षिसे देण्याचे आश्वासन देत असले तरीही यावर क्लिक करु नका.

अनव्हेरिफाइड सोर्सकडून अॅप्स इन्स्टॉल करू नका, कारण यामुळे स्कॅमरना तुमच्या डिव्हाइसच्या कॅमेरा आणि फोटो गॅलरीमध्ये प्रवेश मिळू शकतो. हे बहुतेकदा केवायसी पडताळणीसाठी वापरले जातात.

जर तुम्हाला एखादा विचित्र कॉल आला तर अधिकृत माध्यमांद्वारे कॉलरची ओळख पडताळून पहा.

फिशिंग लिंक्स व्यतिरिक्त, आजकाल स्कॅमर कॉल मर्जिंग, कॉल फॉरवर्डिंग, व्हॉइस मेल स्कॅम, क्यूआर कोड फ्रॉड आणि स्क्रीन शेअरिंग सारख्या प्रगत पद्धती देखील वापरत आहेत.

कॉल मर्जिंग स्कॅम कसा काम करतो?

या घोटाळ्यात, स्कॅमर एखाद्या मीडिया व्यावसायिकाला फोन करतात आणि ओळखीचे असल्याचे भासवतात आणि त्यांना एखाद्या कार्यक्रमाचे कव्हरेज करण्यासाठी आमंत्रित करतात. त्याच वेळी, पीडितेला एका अनोळखी नंबरवरून आणखी एक कॉल येतो. फसवणूक करणारा दावा करतो की दुसरा कॉल एका व्हीआयपी नंबरवरून आला आहे आणि तो पीडितेला दोन्ही कॉल एकत्र करण्यास सांगतो.

एकदा कॉल्स एकत्र केले की, फसवणूक करणारा बँक किंवा अॅप्स (जसे की व्हाट्सअॅप आणि फेसबुक) वरून कॉलद्वारे पाठवलेला ओटीपी कॅप्चर करतो. यानंतर, ते खाते हॅक करतात किंवा पैसे चोरतात.

Web Title: Bank account hacked without sharing OTP, cyber criminals bring new funds; Read what is the real issue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.