पाच वर्षांनंतर 36 चायनीज ॲप्सची भारतात रि-एन्ट्री; गुगल अन् ॲपल स्टोअरवर उपलब्ध...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 22:09 IST2025-02-12T22:01:02+5:302025-02-12T22:09:41+5:30
Banned Chinese Apps: भारत सरकारने 2020 मध्ये 200 पेक्षा जास्त चीनी अॅप्सवर बंदी घातली होती.

पाच वर्षांनंतर 36 चायनीज ॲप्सची भारतात रि-एन्ट्री; गुगल अन् ॲपल स्टोअरवर उपलब्ध...
Banned Chinese Apps: केंद्र सरकारने 2020 मध्ये TikTok सह 200 हून अधिक चीनी ॲप्सवर बंदी घातली होती. पण, आता यापैकी 36 ॲप्स पुन्हा भारतात सुरू झाले आहेत. यामध्ये लोकप्रिय शेअरिंग ॲप Xender देखील सामील आहे. हे ॲप्स Google Play Store आणि Apple Store वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. यातील काही ॲप्स थोड्या बदलांसह परत आले आहेत, जसे की त्यांची ब्रँड नावे किंवा मालक बदलले आहेत. इतर काही ॲप्सने भारतीय कंपन्यांशी करार केला आहे. पण, अद्याप 2020 मध्ये बंदी घातलेला लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ ॲप TikTok परत आला नाही.
अनेक अॅप्सची नावे बदलली
भारतात परत आलेल्या 36 चीनी ॲप्समध्ये Xender, MangoTV, Youku, Taobao आणि डेटिंग ॲप Tantan चा समावेश आहे. Apple च्या App Store वर "Xender: File Share, Share Music" नावाने हे अॅप परत आले आहे. मात्र, सध्या ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. याशिवाय डेटिंग ॲपने त्याचे नाव बदलून "TanTan - Asian Dating App" असे केले आहे.
ही ॲप्स नावे न बदलता परत आली
काही ॲप्सनी त्यांच्या ब्रँड आणि मालकाच्या माहितीमध्ये थोडासा बदल केला आहे, तर काहींनी भारतीय कंपन्यांशी करार करून कायदेशीररित्या काम करण्याचा मार्ग शोधला आहे. चायनीज स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म MangoTV कोणत्याही बदलाशिवाय पुन्हा लाइव्ह झाले आहे. त्याचे नाव किंवा ओळख बदललेली नाही. याशिवाय चीनची एक मोठी व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा युकू, जी अनेकदा यूट्यूबसारखी मानली जाते, ती देखील परत आली आहे.
Pub G देखील परत आले, रिलायन्ससोबत भागीदारी
फॅशन शॉपिंग ॲप शेरीनने रिलायन्ससोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे त्यांचा डेटा फक्त भारतातच राहील. 2020 मध्ये बंदी घातलेला PUBG मोबाइल, दक्षिण कोरियाच्या क्राफ्टन कंपनीच्या अंतर्गत बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) म्हणून परत आला. पण, BGMI वर 2022 मध्ये पुन्हा बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर भारताच्या सुरक्षा नियमांची पूर्तता केल्यानंतर 2023 मध्ये अॅफ पुन्हा सुरू करण्यात आले.