BGMI प्लेयर्स होणार मालामाल; कंपनी देत आहे 6 कोटी रुपये जिंकण्याची संधी  

By सिद्धेश जाधव | Published: February 19, 2022 12:46 PM2022-02-19T12:46:48+5:302022-02-19T12:47:31+5:30

Battlegrounds Mobile India नं यावर्षीच्या आपल्या Esports रोडमॅपची घोषणा केली आहे. कंपनीनं चार टुर्नामेंट्सची घोषणा केली आहे.  

Battlegrounds mobile india bgmi esports roadmap announced for 2022 by krafton with cash prize rs 6 crore | BGMI प्लेयर्स होणार मालामाल; कंपनी देत आहे 6 कोटी रुपये जिंकण्याची संधी  

BGMI प्लेयर्स होणार मालामाल; कंपनी देत आहे 6 कोटी रुपये जिंकण्याची संधी  

Next

लोकप्रिय मोबाईल गेम BGMI (Battlegrounds Mobile India) चे डेव्हलपर Krafton नं साल 2022 साठीच्या Esports रोडमॅपची घोषणा केली आहे. कंपनीनं यावर्षी चार टूर्नामेंट्स होणार असल्याचं सांगितलं आहे. या स्पर्धांमधून 6 कोटी रुपये जिंकता येतील. गेल्यावर्षी मिळालेलं यश पाहून कंपनीनं ही योजना बनवली आहे. गेल्यावर्षी BGMI नं 600,000 अ‍ॅप रजिस्ट्रेशनचा रेकॉर्ड केला होता. तसेच युट्युब आणि फेसबुकवरून 200 मिलियनपेक्षा जास्त व्यूज मिळाल्या आहेत.  

यावर्षी पहिली स्पर्धा BMOC – Battlegrounds Mobile Open Challenge नावानं आयोजित करण्यात येईल. या स्पर्धेत 1 कोटी रुपयांची बक्षिसं दिली जातील. तर 2 कोटी रुपयांची धनराशी बक्षीस म्हणून BMPS – Battlegrounds Mobile Pro Series Season 1 टूर्नामेंटमध्ये देण्यात येईल.  

त्यानंतर 1 कोटी रुपयांच्या बक्षिसांसह BMIS – Battlegrounds Mobile India Series चं आयोजन करण्यात येईल. यावर्षी BMPS – Battlegrounds Mobile Pro Series Season 2 ही कंपनीची चौथी आणि शेवटची स्पर्धा असेल, जी 2 कोटी रुपये बक्षीस स्वरूपात मिळवून देऊ शकते.  

अजूनतरी कंपनीनं या टूनार्मेंटच्या तारखांची घोषणा केली नाही. परंतु Battlegrounds Mobile Open Challenge (BMOC) ची नोदंणी फेब्रुवारीच्या अखेरीस सुरु होऊ शकते. तसेच क्वॉलिफिकेशन गेम्स मार्चच्या अखेरीस सुरु होऊ शकतात. गेल्यावर्षी भारतात पुनरागमन करताना कंपनीनं आपण देशातील ई-स्पोर्टला प्रोत्साहन देणार असल्याचं म्हटलं होतं. 

हे देखील वाचा:

Web Title: Battlegrounds mobile india bgmi esports roadmap announced for 2022 by krafton with cash prize rs 6 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.