PUBG चं सांगतय कमी खेळा गेम! बॅटलग्राऊंड मोबाईल इंडियाने सादर केली जाहिरात
By सिद्धेश जाधव | Published: November 25, 2021 05:16 PM2021-11-25T17:16:07+5:302021-11-25T17:16:43+5:30
BGMI Game Responsibly: Battleground Mobile India ने गेम रिस्पॉन्सिबली ड्राईव्हची सुरुवात केली आहे. या मोहिमे अंतगर्त कमी वयाच्या BGMI प्लेयर्सवर गेममध्ये असलेल्या बंधनांवर भर देण्यात आला आहे.
BGMI Game Responsibly: बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) चे डेव्हलपर क्राफ्टनने आपल्या नव्या ‘गेमिंग रिस्पॉन्सिबली’ कँपेनमध्ये पॅरंटल कंट्रोल्सवर भर दिला आहे. आता एका जाहिरातीमधून कंपनीनं या कंट्रोल्सचा प्रसार करण्यास सुरुवात केली आहे. याचा एक व्हिडीओ देखील गेमच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर प्रकाशित करण्यात आला आहे. तसेच गेमर्सनी आपल्या संघातील सदस्यांच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्याचा संकल्प करावा, यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कंपनीनं एक सीरिज देखील रिलीज केली आहे.
गेम रिस्पॉन्सिबली मोहिमे अंतगर्त BGMI कमी व्हायच्या प्लेयर्सवर असलेल्या बंधनावर भर देत आहे. यात ओटीपीचा समावेश आहे. 18 वर्षांच्या खालील प्लेयर्सना गेममध्ये लॉगिन करण्यासाठी पालकांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सबमिट करणे आवश्यक आहे. गेम सुरु होण्यापूर्वी BGMI कडून हे एक आभासी जग असल्याची चेतावणी दाखवली आणि ऐकवली जाते. 18 वर्षांपेक्षा लहान प्लेयरला गेमसाठी नोंदणी करताना पालकांचा नंबर देणे आवश्यक आहे.
गेम आणि आयुष्यातील संतुलन टिकवण्यासाठी BGMI प्लेयरला ब्रेक टाइम रिमाइंडर देतं. तसेच 18 वर्षांच्या खालील प्लेयर्स रोज फक्त तीन तास गेम खेळू शकतात. तसेच त्यांना गेममध्ये रोज 7000 रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च करता येत नाहीत. यामुळे खर्च आणि गेमिंगचा अतिरेक होत नाही.