2 कोटी लोकांनी केले BattlegrBattlegrounds Mobile India चे प्री-रजिस्ट्रेशन; लाँच तारीख देखील आली जवळ

By सिद्धेश जाधव | Published: June 3, 2021 07:12 PM2021-06-03T19:12:39+5:302021-06-03T19:13:50+5:30

Battlegrounds Mobile India: दक्षिण कोरियन डेवलपर Krafton ने सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली आहे कि Battlegrounds Mobile India गेमने भारतात 2 कोटींपेक्षा जास्त प्री-रजिस्ट्रेशन मिळवले आहेत.

Battlegrounds mobile india cross 20 million pre registrations launch date is yet announce   | 2 कोटी लोकांनी केले BattlegrBattlegrounds Mobile India चे प्री-रजिस्ट्रेशन; लाँच तारीख देखील आली जवळ

बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडियाच्या भारतातील लाँचची तारीख अधिकृतपणे समोर आली नाही.

Next

Battlegrounds Mobile India ने फक्त दोन आठवड्यांमध्ये 2 कोटी प्री-रजिस्ट्रेशनचा आकडा पार केला आहे. याची माहिती कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. गेल्या महिन्यात या गेमची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर अँड्रॉइड युजर्ससाठी 18 मेपासून प्री-रेजिस्ट्रेशन सुरु झाले होते. पण अजूनही हा गेम भारतात कधी लाँच केला जाईल याची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. (PUBG Mobile Indian Version BGMI crosses 20 million pre-registration on Google Play store) 

दक्षिण कोरियन डेवलपर Krafton ने सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली आहे कि Battlegrounds Mobile India गेमने भारतात 2 कोटींपेक्षा जास्त प्री-रजिस्ट्रेशन मिळवले आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला हा गेम भारतात लाँच केला जाईल अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर कंपनीने 18 मेपासून यासाठी प्री-रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरु केली होती. हि प्रक्रिया गुगल प्ले स्टोरच्या माध्यमातून फक्त अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध होती. पहिल्याच दिवशी या गेमसाठी 76 लाख लोकांनी नोंदणी केली होती.  

परंतु, अजूनही बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडियाच्या भारतातील लाँचची तारीख अधिकृतपणे समोर आली नाही.  गेमच्या डेव्हलपर कंपनी Krafton ने गेमप्ले, प्री रेजिस्ट्रेशन केल्यावर मिळणारे रिवॉर्ड्स आणि प्रायव्हसी पॉलिसीची देखली माहिती दिली आहे. परंतु, लाँच डेटची माहिती अजून देण्यात आली नाही. आता अनेक लिक्समधून समोर येत आहे कि हा गेम 18 जून, 2021 रोजी भारतात पुनरागमन करेल.  

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या टीजर्समधून समजले होते कि, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियामध्ये प्लेयर्सना Level 3 Backpack मिळेल, जी गेममधील सर्वात मोठी बॅकपॅक आहे. त्याचबरोबर अशी माहिती समोर येत आहे कि बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया 2जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोन्सवर पण खेळता येईल. तसेच हा गेम खेळण्यासाठी मोबाईलमध्ये Android 5.1.1 किंवा त्यापेक्षा वरची ऑपरेटिंग सिस्टम असणे आवश्यक आहे.   

डेटा सिक्योरिटीचे काय?  

गेल्यावर्षी पबजीवर भारतात बंदी घालताना भारत सरकारने डेटा सिक्युरिटी आणि प्रायव्हसी हि कारणे सांगितली होती. यावेळी डेटा सिक्योरिटी आणि प्रायव्हसीबाबत भारत सरकारच्या नियमांचे पालन आपण करत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाच्या लाँचला काही प्रमाणत विरोध देखील झाला होता. दरम्यान, भारतातील गेमर्स मात्र खूप उत्साही असल्याचे चित्र दिसत आहे.  

Web Title: Battlegrounds mobile india cross 20 million pre registrations launch date is yet announce  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.