BGMI चे दणक्यात आगमन! दोन दिवसांत स्वदेशी PUBG चे 50 लाख डाउनलोड  

By सिद्धेश जाधव | Published: June 19, 2021 06:24 PM2021-06-19T18:24:28+5:302021-06-19T18:25:21+5:30

Battlegrounds Mobile India: PUBG मोबाईलचा स्वदेशी अवतार Battleground Mobile India चा बीटा व्हर्जन 50 लाख लोकांनी डाउनलोड केला आहे.

Battlegrounds mobile india early access release crosses 5 million downloads  | BGMI चे दणक्यात आगमन! दोन दिवसांत स्वदेशी PUBG चे 50 लाख डाउनलोड  

Battlegrounds Mobile India Beta ची घोषणा झाल्यानंतर अनेकांनी यात सहभाग घेतला आणि त्यामुळे नवीन युजर्सना गेम डाउनलोड करता येत नव्हता.

googlenewsNext

Battlegrounds Mobile India चे बीटा व्हर्जन अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी उपलब्ध झाला आहे. 17 जून रोजी डेव्हलपर क्रॉफ्टनने हा गेम भारतातही अँड्रॉइड युजर्ससाठी अर्ली अ‍ॅक्सेसच्या माध्यमातून प्ले स्टोरवर उपलब्ध केला होता. आता कंपनीने सांगितले आहे कि या बीटा व्हर्जनचे फक्त दोन दिवसांत 50 लाख डाउनलोड पूर्ण झाले आहेत.  

BGMI च्या अधिकृत लाँचची तारीख अजून समोर आली नाही. परंतु, प्री-रजिस्टर करणारे युजर्स हा गेम अर्ली अ‍ॅक्सेसद्वारे डाउनलोड करू शकतात. हा अर्ली अ‍ॅक्सेस आयओएस युजर्ससाठी कधी उपलब्ध होईल याची माहिती मात्र अजून समजली नाही.  

50 लाख डाउनलोड पूर्ण झाल्यामुळे गेममध्ये प्लेयर्सना रिवॉर्ड्स देण्यात आले आहेत. आता प्लेयर्सना क्लासिक क्रेट कुपन देण्यात आले आहेत. तर 1 कोटी डाउनलोडनंतर कॉन्स्टेबल सेट रिवॉर्ड म्हणून देण्यात येईल.  

इथून करा Battlegrounds Mobile India Beta डाउनलोड  

Battlegrounds Mobile India Beta व्हर्जन सध्या फक्त अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध झाला आहे, हे व्हर्जन गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करता येईल. अँड्रॉइड स्मार्टफोन BGMI आपल्या फोनमध्ये इन्स्टाल कारण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - BGMI Download and Play  

BGMI फोनमध्ये डाउनलोड करण्याआधी त्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही गेम डाउनलोड करण्यापूर्वी गुगल प्ले स्टोरवर जाऊन प्री- रेजिस्ट्रेशन करू शकता.   

Battlegrounds Mobile India Beta ची घोषणा झाल्यानंतर अनेकांनी यात सहभाग घेतला आणि त्यामुळे नवीन युजर्सना गेम डाउनलोड करता येत नव्हता. परंतु, आता क्रॉफ्टनने युजर्सची मर्यादा वाढवली आहे आणि हा गेम सर्वांसाठी खुला केला आहे.  

Web Title: Battlegrounds mobile india early access release crosses 5 million downloads 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.