BGMI प्रेमींसाठी महत्वाची सूचना! गेमच्या लॉगिन नियमांमध्ये मोठे बदल  

By सिद्धेश जाधव | Published: September 4, 2021 03:17 PM2021-09-04T15:17:10+5:302021-09-04T15:18:00+5:30

BGMI Update: फेसबुकच्या पॉलिसी अपडेटनंतर Battlegrounds Mobile India वरील Facebook अकॉउंटवरून डेटा ट्रान्सफर बंद करण्यात येईल, तसेच लॉगिनची पद्धत बदलण्यात आली आहे.  

Battlegrounds mobile india shut down facebook data transfers   | BGMI प्रेमींसाठी महत्वाची सूचना! गेमच्या लॉगिन नियमांमध्ये मोठे बदल  

BGMI प्रेमींसाठी महत्वाची सूचना! गेमच्या लॉगिन नियमांमध्ये मोठे बदल  

googlenewsNext
ठळक मुद्देहा बदल फेसबुक सॉफ्टवेयर डेवलपमेंट किट (SDK) च्या एका पॉलिसीमधील अपडेटमुळे करण्यात आला आहे.जे प्लेयर्स गुगल प्ले आणि ट्विटर लॉगिनचा वापर करतात त्यांच्यावर या बदलाचा कोणताही परिणाम होणार नाही.  

Battlegrounds Mobile India ने काही मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. यातील महत्वाचा बदल म्हणजे आता फेसबुकचा वापर करून प्लेयर्सना अकॉउंट डेटा ट्रान्सफर करता येणार नाही. फेसबुकने आपल्या पॉलिसीमध्ये केलेल्या बदलामुळे BGMI ला हा निर्णय घ्यावा लागला आहे. ट्विटरचा वापर करून अजूनही प्लेयर्स अकॉउंट डेटा ट्रान्सफर करू शकतात.  

गेल्यावर सप्टेंबरमध्ये भारतात PUBG Mobile वर बंदी घालण्यात आली होती आणि यावर्षी जुलैमध्ये हा गेम Battlegrounds Mobile India नावाने देशात परतला आहे. गेम पुन्हा आल्यानंतर जुन्या पबजी अकॉउंटवरील डेटा नवीन BGMI वर ट्रान्सफर करता येत होता. यासाठी PUBG मोबाईलमध्ये लॉग इन करण्यासाठी फेसबुक किंवा ट्विटर अकॉउंटचा वापर करता येत होता. आता 28 सप्टेंबरपासून फेसबुक अकॉउंटचा वापर करून डेटा ट्रान्सफर करता येणार नाही, अशी घोषणा क्राफ्टनने केली आहे.  

हा बदल फेसबुक सॉफ्टवेयर डेवलपमेंट किट (SDK) च्या एका पॉलिसीमधील अपडेटमुळे करण्यात आला आहे. या अपडेटमुळे अँड्रॉइड डिवाइसमधील एम्बेडेड ब्राउजरच्या माध्यमातून फेसबुक अकॉउंट लॉग-इन डिसेबल करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्हाला PUBG मोबाईल डेटा फेसबुकच्या माध्यमातून बॅटलग्राउंड मोबाईलवर आणायचा असेल तर हे काम 28 सप्टेंबरच्या आधी करून घ्या. iOS युजर्सवर याचा परिणाम होणार नाही.  

फेसबुकच्या पॉलिसी अपडेटचा अजून एक परिणाम BGMI प्लेयर्सवर होणार आहे. इनबिल्ट अँड्रॉइड ब्राउजरमधून फेसबुक लॉगिन करता येणार नाही. त्यामुळे बॅटलग्राउंड मोबाईल इंडियाच्या खेळाडूंना 5 ऑक्टोबरनंतर गेममध्ये लॉग इन करण्यासाठी फेसबुक अ‍ॅप इंस्टॉल करावे लागेल. त्याशिवाय प्लेयर्स गेममध्ये लॉगिन करू शकणार नाहीत. जे प्लेयर्स गुगल प्ले आणि ट्विटर लॉगिनचा वापर करतात त्यांच्यावर या बदलाचा कोणताही परिणाम होणार नाही.  

Web Title: Battlegrounds mobile india shut down facebook data transfers  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.