सावधान...सेन्सर्सच्या मदतीने हॅक होऊ शकतो स्मार्टफोन !

By शेखर पाटील | Published: January 1, 2018 05:07 PM2018-01-01T17:07:28+5:302018-01-01T17:07:54+5:30

स्मार्टफोनमधील सेन्सर्स युजर्ससाठी अतिशय उपयुक्त असले तरी याच्याच मदतीने स्मार्टफोन हॅक करणे सहजशक्य असल्याचे तंत्रज्ञांच्या एका चमूने सिध्द करून दाखविले आहे.

Be careful ... hackers can hack smartphone with censors | सावधान...सेन्सर्सच्या मदतीने हॅक होऊ शकतो स्मार्टफोन !

सावधान...सेन्सर्सच्या मदतीने हॅक होऊ शकतो स्मार्टफोन !

Next

स्मार्टफोनमधील सेन्सर्स युजर्ससाठी अतिशय उपयुक्त असले तरी याच्याच मदतीने स्मार्टफोन हॅक करणे सहजशक्य असल्याचे तंत्रज्ञांच्या एका चमूने सिध्द करून दाखविले आहे.

स्मार्टफोनची सुरक्षा हा अलीकडच्या काळात एक चिंतेचा विषय बनला आहे. विविध अ‍ॅप्लीकेशन्स हे युजरला त्याच्या फोनचा पूर्ण अ‍ॅक्सेसची परवानगी मागत असतात. नंतर याच माहितीच्या आधारे स्मार्टफोनमधील इत्यंभूत माहिती संबंधीत अ‍ॅपच्या कंपनीच्या सर्व्हरवर जमा होत असते. बहुतांश कंपन्या या माहितीला जाहिरातदारांना विकत असतात. इथवर ठिक आहे. मात्र या माहितीचा गैरवापर होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता नेमक्या याच पध्दतीने स्मार्टफोनमधील सेन्सर्सच्या माध्यमातून कोणत्याही स्मार्टफोनमध्ये गोपनीयरित्या शिरणे शक्य असल्याचे एका अध्ययनातून दिसून आले आहे. या संदर्भात क्रिप्टोलॉजी ई-प्रिंट आर्काईव्हवर सविस्तर वृत्तांत प्रकाशित करण्यात आला आहे.

सिंगापूर येथील नानयांग टेक्नॉलॉजी युनिव्हर्सीटीचे शिवम भसीन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या संदर्भात अध्ययन करून याचा रिसर्च पेपर सादर केला आहे. यात स्मार्टफोन्समधील सेन्सर्स हा हॅकर्ससाठी अतिशय सोपा मार्ग असल्याचे दिसून आले आहे. जगभरातील विविध स्मार्टफोन्समध्ये अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, प्रॉक्झिमिटी सेन्सर, अँबिअंट लाईट सेन्सर, मॅग्नेटोमीटर आणि बॅरोमीटर व अन्य सेन्सर्स असतात. कोणतेही अ‍ॅप इन्स्टॉल करतांना सेन्सर्सच्या वापराच्या परवानगीची आवश्यकता भासत नाही. नेमक्या याच त्रुटीचा वापर करून सेन्सर्सच्या माध्यमातून स्मार्टफोन हॅक करता येत असल्याचे भसीन आणि त्यांच्या चमूने दाखवून दिले आहे. कोणताही युजर हा स्मार्टफोनवरी सिक्युरिटी पीन टाकण्यासह अन्य फंक्शन्सचा वापर करत असतांना विशिष्ट पध्दतीने टचस्क्रीनवर दबाव टाकत असतो. याला विविध सेन्सर्स आपापल्या परीने प्रतिसाद देत असतात. याचाच वापर करून ९९.५ टक्के इतक्या अचूकपणे स्मार्टफोनचा सिक्युरिटी पीन मिळवत स्मार्टफोन हॅक करता येत असल्याचे या चमूने दाखवून दिले आहे. यामुळे स्मार्टफोनचे सेन्सर्सला सुरक्षा कवचाची आवश्यकता असल्याची बाबदेखील अधोरेखित झाली आहे.

Web Title: Be careful ... hackers can hack smartphone with censors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल