‘पीडीएफ’ डाऊनलोड करताना सावधान! 'अशी' घ्या काळजी अन्यथा व्हाल हॅकर्सची शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 05:52 AM2021-05-31T05:52:32+5:302021-05-31T05:52:53+5:30
कदाचित त्यात मालवेअर असू शकते
पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट अर्थात पीडीएफ फाइल सर्वांनाच आवडते. टेक्स्ट फाइलची पीडीएफ केली की ती कुठेही, कधीही डाऊनलोड करता येते, हा त्याचा फायदा. अनेकांना पीडीएफ डाऊनलोड करायची घाईच असते. मात्र, अशांसाठी मायक्रोसॉफ्टने धोक्याचा इशारा दिला आहे. त्या फाइलमध्ये कदाचित मालवेअर असू शकतात.
- काय सांगतो मायक्रोसॉफ्टचा इशारा
अनेक लोकांना ई-मेलमध्ये अटॅच केलेली पीडीएफ फाइल डाऊनलोड करण्याची घाई असते
परंतु या पीडीएफ फाइलमध्ये ट्रोजन मालवेअर असण्याची दाट शक्यता आहे
पीडीएफ डाऊनलोड केल्यानंतर त्यातील मालवेअर तुमच्या डेटावर हल्ला करू शकतात. हॅकर्सच्या या आमिषाला बळी पडू नका
मायक्रोसॉफ्टच्या सिक्युरिटी इंटेलिजन्स काय म्हणते?
सहज जाळ्यात सापडू शकतील अशा ई-मेलधारकांना हॅकर्स अशा प्रकारचे मेल्स पाठवीत आहेत
ट्रोजन मालवेअर फाइलला स्ट्रारॅट असे संबोधले जाते
पीडीएफच्या आड दडलेले हे स्ट्रारॅट सुरू झाले की ते ई-मेलधारकाचा पासवर्ड चोरते, संगणक वा लॅपटॉपवर तुम्ही बँकेशी निगडीत काही महत्त्वाची माहिती सेव्ह केली असेल तरी त्याचीही चोरी होते
सर्वात कडी म्हणजे या पीडीएफमधील ट्रोजन मालवेअर स्वत:ला रॅनसमवेअर असेही संबोधतात
ही पीडीएफ डॉट क्रिमसन या नावाने आलेली असते. तसेच ती पीडीएफच्या स्वरूपात आलेली असल्याने लोक भुलतात आणि ओपन करतात
बहुतांश सामाजिक कामात कार्यरत असलेल्या लोकांनाच हॅकर्स लक्ष्य करतात
काय खबरदारी घ्यावी?
लोकांनी संशयास्पद वाटतील अशा पीडीएफ डाऊनलोड करू नये
मेल बॉक्समध्ये अशा फाइल आल्याच तर त्या ओपन न करता डिलीट कराव्या
मायक्रोसॉफ्टचे ३६५ डिफेंडर हे सॉफ्टवेअर अशा प्रकारच्या मालवेअर हल्ल्यापासून बचाव करू शकते