TWS Earbuds: अॅप्पलच्या चिपसह Beats चे दमदार इयरबड्स लाँच; एकदा चार्ज करा आणि 24 तास वापरा
By सिद्धेश जाधव | Published: January 29, 2022 07:36 PM2022-01-29T19:36:46+5:302022-01-29T19:37:03+5:30
Beats Fit Pro TWS Earbuds: Beats Fit Pro मध्ये अॅप्पलच्या ड्युअल-एलिमेंट डायफ्राम ड्रायव्हरचा वापर करण्यात आला आहे.
Beats Fit Pro गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत लाँच करण्यात आले होते. आता यांचा जागतिक लाँच करण्यात आला आहे. यात अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC), स्पॅटियल ऑडियो स्प्लॅश रेजिस्टन्स आणि अॅप्पलचा H1 चिप देण्यात आली आहे. सिंगल चार्जवर हे इयरबड्स 24 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देऊ शकतात. चला जाणून घेऊया Beats Fit Pro TWS Earbuds ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
Beats Fit Pro ची किंमत
Beats Fit Pro ची यूएसमध्ये किंमत 199.99 डॉलर्स (सुमारे 15,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. हे बीट्स इयरबड्स ब्लॅक, व्हाइट, सेज ग्रे आणि स्टोन पर्पल कलरमध विकत घेता येतील. सध्या हे इयरबड्स यूके, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलँड, कॅनडा, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि अन्य देशांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत. परंतु कंपनीनं यांच्या भारतीय लाँचची माहिती मात्र दिलेली नाही. हे बीट्स इयरबड्स ब्लॅक, व्हाइट, सेज ग्रे आणि स्टोन पर्पल कलरमध विकत घेता येतील.
Beats Fit Pro TWS Earbuds चे स्पेसिफिकेशन्स
या इयरबड्समध्ये अॅप्पलच्या ड्युअल-एलिमेंट डायफ्राम ड्रायव्हरचा वापर करण्यात आला आहे, जो स्पष्ट आवाज देण्याचं काम करतो. यात ट्रांसपेरेंट मोडसह ANC फिचर देण्यात आलं आहे, ज्यात बॅकग्राउंड नॉइज ऐकता येतं. इयरबड्स अॅप्पलच्या H1 चिपसह येतात. त्यामुळे आपोआप डिवाइसेसमध्ये स्विच करण्याचं आणि ऑडियो शेयरिंगचं फिचर मिळतं.
यात डायनॅमिक हेड ट्रॅकिंग टेक्नॉलॉजीसह स्पॅटियल ऑडियो देण्यात आला आहे. यात स्वेट आणि वॉटर रेजिस्टेंससाठी IPX4 रेटिंग देण्यात आली आहे. सोबत एक सिंगल मल्टी-फंक्शन बटन मिळतो. हे इयरबड्स अॅप्पलच्या फाईंड माय अॅपमधून ट्रॅक करता येतात. ANC फिचर ऑन असल्यास सहा तासांचा तर ऑन असल्यास 7 तासांचा प्ले बॅक टाइम मिळतो. चार्जिंग केसमुळे हा टाइम 24 तासांवर जातो.
हे देखील वाचा:
Amazon Sale: गेमिंग लॅपटॉप झाले स्वस्त; दमदार परफॉर्मन्सवर मिळतेय मोठी सवलत
540 रुपयांमध्ये तुमचा होईल Oppo शानदार 5G Phone; 31 जानेवारीनंतर मिळणार नाही अशी ऑफर