WhatsApp, Signal, Telegram सारख्या १५ अॅप्सवरील मेसेजेसना एकाच अॅपवरून करा रिप्लाय
By जयदीप दाभोळकर | Published: January 23, 2021 01:27 PM2021-01-23T13:27:54+5:302021-01-23T13:30:10+5:30
आलं ऑल इन वन अॅप, मेसेजिंग अॅप्सना एकाच ठिकाणी मॅनेज करता येणार
प्रत्येक जण सध्या किंमान दोन तीन मेसेजिंग अॅप्सचा वापर तरी करतच असेल. यात प्रत्येक मेसेजिंग अॅप्सवरचे मेसेज जाऊन प्रत्येक वेळी वाचणं शक्यही होत नाही. परंतु आता यासाठी एक भन्नाट अॅप आलं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी वेगवेगळी अॅप्स ओपन करून त्यात जाऊन मेसेजेस वाचण्याची गरजच पडणार नाही. या अॅप्सच्या मदतीनं तुम्हाला १५ पेक्षा अधिक मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स एकाच ठिकाणी ठेवता येणार आहेत.
'बीपर' असं या नव्या अॅपचं नाव आहे. याच्या माध्यमातून अनेक अॅपमधील मसेजे या एकाच अॅपमध्ये पाहता येतील. या अॅपच्या मदतीनं युझरला १५ मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स एकाच ठिकाणी मॅनेज करण्याची सुविधा मिळणार आहे. हे अॅप सेंट्रल हब प्रमाणे काम करतं. यामध्ये फेसबुक मेसेंजर, सिग्नल, ट्विटर, टेलीग्राम, व्हॉट्सअॅप सारख्या अॅप्सचा लाभ घेता येईल.
New app alert: I've been working on Beeper for a while and today we're launching! It's a single app to chat on iMessage, WhatsApp, and 13 other networks. Been using it as my default chat client for the last 2 years and there is NO going back. Check it out https://t.co/vjAtnYvdhSpic.twitter.com/rJ39rPFixb
— Eric Migicovsky (@ericmigi) January 20, 2021
याव्यतिरिक्त या अॅपची महत्त्वाची बाब म्हणजे बीपरमध्ये आयमेसेजचाही वापर करता येऊ शकतो. याव्यतिरिक्त हे अॅप अँड्रॉईड, विंडोज आणि लिनक्सवर काम करतं. यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे हे अॅप युझर्सना मोफत मिळणार नाही. या अॅपचा वापर करण्यासाठी युझरला दर महिन्याला १० डॉलर्स म्हणजेच जवळपास ७५० रूपये द्यावे लागणार आहेत. याच्या माध्यमातून युझर्सना सर्वच अॅप्स एकाच प्लॅटफॉर्मवर वापरता येतील. यावर गुगल हँगआऊट, आयमेसेज, इन्स्टाग्राम, आयआरसी. मॅट्रिक्स, फेसबुक मेसेंजर. सिग्नल, स्काईप, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, ट्विटर, स्लॅक अशा अनेक अॅप्सचा सपोर्ट आहे. यापूर्वी हे अॅप NovaChat या नावानं ओळखलं जात होतं. Eric Migicovsky यांनी हे अॅप विकसित केलं आहे.