नवा फ्रॉड! कुरिअरने फोन घरी पाठवला अन् नंतर बँक खात्यातून २.८० कोटींवर डल्ला मारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:49 IST2025-01-21T12:49:22+5:302025-01-21T12:49:34+5:30

एका व्यक्तीला अत्यंत हुशारीने फसवण्यात आलं आणि त्याच्या बँक खात्यातून तब्बल २.८० कोटी रुपये चोरीला गेले.

bengaluru techie falls victim to rs 280 crore cyber fraud | नवा फ्रॉड! कुरिअरने फोन घरी पाठवला अन् नंतर बँक खात्यातून २.८० कोटींवर डल्ला मारला

नवा फ्रॉड! कुरिअरने फोन घरी पाठवला अन् नंतर बँक खात्यातून २.८० कोटींवर डल्ला मारला

सायबर फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एका व्यक्तीला अत्यंत हुशारीने फसवण्यात आलं आणि त्याच्या बँक खात्यातून तब्बल २.८० कोटी रुपये चोरीला गेले. या प्रकरणात या व्यक्तीला फोन कुरिअरद्वारे पाठवण्यात आला. 

सायबर फसवणुकीची सुरुवात ही २७-११-२०२४ रोजी आलेल्या व्हॉट्सएप कॉलद्वारे झाली. व्हॉट्सएप कॉल करणाऱ्या व्यक्तीने  सिटी बँकेचा कर्मचारी असल्याचा  खोटा दावा केला होता. यानंतर सायबर फसवणुकीला सुरुवात झाली. 

सायबर फसवणूक करणाऱ्याने व्यक्तीला सांगितलं की त्याने पेडिंग क्रेडिट कार्ड एप्लिकेशनच्या अप्रूव्हलसाठी कॉल केला आहे. यानंतर, अप्रूव्हल क्लिअर करण्यासाठी खोटी प्रोसेस सांगितली गेली.

व्यक्तीला नवीन सिम कार्ड खरेदी करण्यास सांगितलं गेलं, त्यानंतर कुरिअरद्वारे स्मार्टफोन पाठवण्यात आला. हे पार्सल सिटी बँकेच्या नावाने पाठवण्यात आलं होतं आणि व्यक्तीने सायबर फसवणूक करणाऱ्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला.

फोनमध्ये आधीच होते धोकादायक एप्स

फोनमध्ये सिम कार्ड घालण्यास सांगण्यात आलं. व्यक्तीला कल्पना नव्हती की, पाठवलेल्या मोबाईलमध्ये धोकादायक एप्स देखील असू शकतात, जे मोबाईल हॅकिंग आणि बेकायदेशीर डेटा ट्रान्सफरमध्ये मदत करतात. यानंतर मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकताच, त्या फोनमध्ये आधीच असलेले धोकादायक एप काम करू लागले.

बँक तपशील आणि OTP 

सायबर स्कॅमर्सनी धोकादायक एपच्या मदतीने बँक तपशील आणि ओटीपी इत्यादींमध्ये गुपचूप प्रवेश मिळवला. यानंतर, व्यक्तीच्या बँक खात्यातील पैसे, इतर बचत आणि एफडी इत्यादींवर डल्ला मारला आणि एकूण २.८ कोटी रुपयांची फसवणूक झाली.

सायबर गुन्हेगार आता मोबाईलमध्ये छेडछाड करतात आणि त्यामध्ये धोकादायक एप्स इन्स्टॉल करतात. यानंतर व्यक्तीला हा टेम्पर्ड हँडसेट देतात आणि त्याला सिम कार्ड टाकण्यास सांगतात. जर व्यक्तीने सिम कार्ड घातलं तर सायबर गुन्हेगार गुपचूप त्याच्या बँकेचे तपशील आणि ओटीपी इत्यादी मिळवतात आणि नंतर बँक खातं हॅक करतात.
 

Web Title: bengaluru techie falls victim to rs 280 crore cyber fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.