थिएटरला देखील मागे टाकेल ‘हा’ 4K रिजॉल्यूशन असलेला प्रोजेक्टर; दमदार इनबिल्ट स्पिकरसह भारतात लाँच
By सिद्धेश जाधव | Published: March 15, 2022 01:23 PM2022-03-15T13:23:14+5:302022-03-15T13:23:55+5:30
BenQ X3000i प्रोजेक्टर भारतात लाँच झाला आहे. यातील 4K रिजोल्यूशन शानदार पिक्चर क्वॉलिटी देऊ शकतो.
BenQ नं भारतात आपला नवीन प्रोजेक्टर BenQ X3000i लाँच केला आहे. सर्वप्रथम हा 4Kप्रोजेक्टर CES 2022 मध्ये जगासमोर ठेवण्यात आला होता. यात स्मूद पिक्चर क्वॉलिटीसाठी 60Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. तसेच 16ms रिस्पॉन्स टाइम असलेला हा प्रोजेक्टर, HDR10, 100 टक्के DPI-P3 कलर गोमट आणि इनबिल्ट अँड्रॉइड टीव्हीला सपोर्ट करतो.
BenQ X3000i चे स्पेसिफिकेशन
BenQ X3000i मध्ये 4K रिजॉल्यूशन (3840x2160 पिक्सल) देण्यात आलं आहे. सोबत 60Hz रिफ्रेश रेट, HDR10 आणि HLG सपोर्ट मिळतो. याचा कॉन्ट्रास्ट रेशियो 50,00,000:1 इतका आहे. पिक्चर क्वॉलिटी 1080 पिक्सल केल्यास 240Hz रिफ्रेश रेट मिळेल, त्यामुळे अजून स्मूद व्हिडीओ प्ले होऊ शकतो. यात कंपनीची Dynamic ब्लॅक टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी क्विक डिमिंग आणि RGB कलर आडजस्टमेंटमध्ये मदत करते.
BenQ X3000i प्रोजेक्टरमधील ‘4LED' लाईट सोर्स 3,000 ANSI ल्यूमेन ब्राईटनेस देतो. यात कंपनीनं 10W चे इनबिल्ट Benq treVolo स्पिकर दिले आहेत, सोबत Bongiovi डिजिटल पावर स्टेशन (DPS) अल्गोरिदम देण्यात आला आहे, जो रियल टाइम मध्ये साउंड ऑप्टिमाइज करतो. यात तीन गेमिंग मोड देण्यात आले आहेत.
BenQ X3000i ची किंमत 4,00,000 रुपये ठेवण्यात आली आहे आणि हा प्रोजेक्टर ऑफलाईन रिटेल स्टोरवरून देखील विकत घेता येईल. या प्रोजेक्टर कंपनी दोन वर्षांची वॉरंटी देत आहे.
हे देखील वाचा:
- ...म्हणूनच अॅप्पल नंबर वन! फोनच्या बॉक्समध्ये छोटासा बदल करून वाचवले 50 हजार कोटी रुपये
- 108MP कॅमेरा असलेल्या भन्नाट Redmi फोनवर मिळतोय 3000 रुपयांचा डिस्काउंट; आज आहे पहिला सेल
- फक्त 6,500 रुपयांमध्ये आला दमदार स्मार्टफोन; जियोफोन नेक्स्टला आसमान दाखवणार?