15,000 रुपयांमध्ये मिळणारे बेस्ट 5G फोन
By सिद्धेश जाधव | Published: July 9, 2021 07:12 PM2021-07-09T19:12:19+5:302021-07-09T19:30:44+5:30
Cheap 5G Phones India: भारतात पोको, रियलमी आणि ओप्पोने 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन्स लाँच केले आहेत.
भारतात 5G च्या ट्रायल्सनी वेग धरला आहे. एयरटेल आणि जियोनंतर वोडाफोन-आयडियाने देखील 5G नेटवर्कची तयारी सुरु केली आहे. परंतु टेलिकॉम कंपन्यांचाही आधी स्मार्टफोन कंपन्यांनी 5G ची तयारी केली आहे. या कंपन्यांनी हायएंड 5G स्मार्टफोन सोबतच लो बजेटमध्ये देखील 5G नेटवर्क क्षमता असलेले स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. जर तुम्ही 5G नेटवर्कला सपोर्ट करणारा स्मार्टफोन शोधत असाल आणि बजेट कमी असेल शोधात तर गोंधळून जाऊ नका. आम्ही तुमच्यासाठी भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो आहोत. या स्मार्टफोन्सची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे.
Poco M3 Pro 5G
POCO M3 Pro भारतात 13,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 2400 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा फुलएचडी+ 90hz एलसीडी डिस्प्ले आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 12 सह येतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 5G चिपसेट देण्यात आला आहे.
POCO M3 Pro 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर मिळतो. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी पोको एम3 प्रो 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमधील 5,000एमएएचची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
OPPO A53s 5G
15 हजार रुपयांच्या बजेटच्या काठावर ओपोचा Oppo A53s बाजारात उपलब्ध आहे. या फोनची किंमत 14,990 रुपये आहे. या फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेट आणि 720 x 1600 पिक्सेल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. Oppo A53s मध्ये MediaTek Dimensity 700 SoC, 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेजसह भारतात सादर करण्यात आला आहे.
या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये, 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आहे. या सेन्सरला 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरची जोड देण्यात आली आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. ओपो A53s 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Realme 8 5G
भारतातील सर्वात पहिला 5G फोन लाँच केल्यानंतर रियलमीने बजेट 5जी फोन देखील लाँच केले आहेत. असाच एक फोन म्हणजे Realme 8 5G, ज्याची किंमत कंपनीने 13,999 रुपये ठेवली होती. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये मीडियाटेक Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे.
Realme 8 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलची मोनोक्रोम लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. Realme 8 5G मधील रियर आणि फ्रंट असे दोन्ही कॅमेरे Super Nightscape मोडला सपोर्ट करतात. या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.