सुस्थितीत असलेला Second Hand Smartphone हवा आहे? मग या वेबसाईट्सवर टाका एक नजर 

By सिद्धेश जाधव | Published: October 22, 2021 06:53 PM2021-10-22T18:53:49+5:302021-10-22T18:53:55+5:30

Best Websites For Second Hand Mobile Phone: तुम्ही ऑनलाईन क्लाससाठी किंवा इतर काही कारणांसाठी सुस्थितीत असलेला Second Hand Smartphone शोधत असाल तर पुढे आम्ही अशाच प्लॅटफॉर्मची माहिती दिली आहे, जे तुम्हाला कमी किंमतीत चांगले ऑप्शन्स देऊ शकतात.  

best place to purchase second hand smartphone know where to buy  | सुस्थितीत असलेला Second Hand Smartphone हवा आहे? मग या वेबसाईट्सवर टाका एक नजर 

सुस्थितीत असलेला Second Hand Smartphone हवा आहे? मग या वेबसाईट्सवर टाका एक नजर 

googlenewsNext

भारतात मोबाईल फोन्सना मोठी मागणी आहे. त्यामुळेच स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या भारतीय बाजारपेठेकडे जास्त लक्ष देत असतात आणि सतत नवनवीन स्मार्टफोन्स सादर करत असतात. परंतु दरवेळी नवीन मोबाईलची गरज नसते, काही ठिकाणी सेकंड हॅन्ड फोन देखील गरज भागवू शकतो. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन क्लाससाठी किंवा इतर काही कारणांसाठी सुस्थितीत असलेला Second Hand Mobile phone शोधत असाल तर पुढे आम्ही अशाच प्लॅटफॉर्मची माहिती दिली आहे, जे तुम्हाला कमी किंमतीत चांगले ऑप्शन्स देऊ शकतात.  

OLX 

जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री करण्यासाठी OLX हा सर्वात जुना प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळेच अनेकजण Second Hand Smartphone च्या खरेदीसाठी ओएलएक्सची निवड करतात. इथे तुम्ही वस्तू विकणाऱ्या किंवा खरेदी करणाऱ्या लोकांशी थेट संपर्क करू शकता. तसेच तुम्ही किंमत देखील कमी जास्त करवून घेऊ शकता.  

2Gud 

टूगुड देखील युजर्सना Second Hand Smartphone विकत घेण्यासाठी प्लॅटफॉर्म देते. विशेष म्हणजे या वेबसाईटच्या मागे Flipkart हा हात आहे. इथे जुने फोन विकत देखील येतात. ही वेबसाईट आता फ्लिपकार्ट कनेक्टड आहे. ही वेबसाईट फक्त जुन्या आणि वापरलेल्या मोबाईल फोनसाठी आहे. इथे ग्राहकांनी अनबॉक्स करून परत पाठवलेले दिलेले प्रोडक्ट देखील मिळू शकतात. ज्यांची क्वॉलिटी जास्त चांगली असू शकते. 

Amazon 

ई-कॉमर्स साईट अ‍ॅमेझॉन इंडियावर Refurbished Second Hand Smartphone खूप आधीपासून मिळत आहेत. यासाठी अ‍ॅमेझॉनने ‘Renewed’ नावाचा सेग्मेंट तयार केला आहे. अ‍ॅमेझॉनवर सध्या फक्त Android फोन्स उपलब्ध आहेत. जर तुम्ही सेकेंड हॅन्ड स्मार्टफोन शोधत असाल तर अ‍ॅमेझॉनवर चांगली डील मिळू शकते.  

Cashify 

Refurbished Mobile किंवा Second Hand Smartphone मध्ये व्यवहार करणारी एक नवीन वेबसाईट म्हणजे कॅशिफाय. इथे तुम्ही तुमचा जुना फोन विकून पैसे मिळवू शकता. तसेच इथून वापरलेला फोन विकत देखील घेऊ शकता. या वेबसाईटवर तुमच्या आवडीनुसार तुम्ही Mobile Brand, RAM आणि Storage असे पर्याय निवडू शकता. तसेच वेबसाईटवरील डिस्काउंट ऑफर्सचा देखील फायदा घेऊ शकता.  

Yaantra 

यांत्रा डॉट कॉमवर देखील जुन्या मोबाईलच्या बदल्यात पैसे देत. तसेच इथून वापरलेले स्मार्टफोन विकत घेता येतील. या वेबसाईटवर विविध ब्रँड्स आणि मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वेबसाईटवर वेगवेगळ्या बजेटनुसार हे फोन विकत घेता येतील. Refurbished Smartphone वर युजर्सना डील्स आणि डिस्काउंट देखील मिळतो. Yaantra.com वेबसाईट Second Hand Mobile phone वर वॉरंटी देखील मिळते.  

Web Title: best place to purchase second hand smartphone know where to buy 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.