सावधान... 'नॅशनल क्रश' प्रिया प्रकाशच्या नादात मोबाइल होईल क्रॅश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 12:27 PM2018-02-17T12:27:59+5:302018-02-17T12:40:48+5:30
भुवया उडवून, डोळा मारून देशभरातील तरुणाईला घायाळ करणाऱ्या आणि एका रात्रीत 'नॅशनल क्रश' झालेल्या प्रिया प्रकाशची सध्या इतकी क्रेझ आहे की तिचे फोटो, व्हिडिओ पाहायला सगळेच उतावीळ असतात. तुम्हीही त्यापैकीच एक असाल, तर वेळीच सावध व्हा.
मुंबईः भुवया उडवून, डोळा मारून देशभरातील तरुणाईला घायाळ करणाऱ्या आणि एका रात्रीत 'नॅशनल क्रश' झालेल्या प्रिया प्रकाशची सध्या इतकी क्रेझ आहे की तिचे फोटो, व्हिडिओ पाहायला सगळेच उतावीळ असतात. तुम्हीही त्यापैकीच एक असाल, तर वेळीच सावध व्हा. कारण, प्रिया प्रकाशच्या नावाने तेलुगू भाषेतील मजकूर आयफोनवर फिरतोय. तो 'टेक्स्ट बॉम्ब' व्हायरस असून त्याने आत्तापर्यंत कैक आयफोन क्रॅश करून टाकलेत.
प्रिया प्रकाशबाबतचा तेलुगू भाषेतील मजकूर आयफोन यूजर्सच्या मेसेज बॉक्समध्ये जातो. त्यावर क्लिक केल्यास काही सेकंदांत आयफोन बंद होतो. हा 'टेक्स्ट बॉम्ब' आयफोनसोबतच स्मार्ट वॉच, मॅकबुकसाठीही धोकादायक ठरतोय. अॅपल कंपनीने त्याची गंभीर दखल घेतली असून हा व्हायरस नष्ट करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. आयओएस ११.२.५ वर चालणारे आयफोन या व्हायरसमुळे क्रॅश झालेत. त्याच्या आधीच्या व्हर्जनच्या आयफोन सुरक्षित आहेत.
दरम्यान, प्रिया प्रकाश वॉरियरने तरुणांना किती 'याड' लावलंय, हे गुगल सर्चच्या आकड्यांवरून स्पष्ट होतं. गुगल सर्चमध्ये तिने सनी लिओनीला मागे टाकलं आहे. फक्त सनीच नाही तर दीपिका पदुकोन, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांनाही प्रिया टक्कर देत आहे. एका रात्रीत सुपरहिट झालेल्या प्रियाबद्दल माहिती मिळवण्यासाठी गुगलवर 'प्रिया प्रकाश' नावाने सर्च केलं जात आहे.