सावधान, आता व्हॉट्सअॅपही...! खासगी क्षणही ऐकतेय, ट्विटरच्या इंजिनिअरने केली 'पोलखोल'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 10:45 AM2023-05-10T10:45:38+5:302023-05-10T10:48:42+5:30
ट्विटरवर चर्चा सुरु आहेय की व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचे खासगी बोलणे एकतेय.
तुमचा आवाज कोण रेकॉर्ड करत नाहीय, तुमच्या मोबाईलमधील सर्व अॅप्स, तुमच्या घरातील स्मार्ट डिव्हाईसेस आदी सारेच तुमचा खासगी आवाज ऐकत असतात. आता त्यात व्हॉट्सएपचा समावेश झाला आहे. तुम्ही एखाद्या वस्तूबाबत बोललात की तिची अॅड लगेचच तुम्हाला फेसबुक, वेब ब्राऊजर किंवा अॅपवर दिसू लागते. ही कशी दिसते? ती अशाप्रकारे तुमचे बोलणे ऐकून दाखविली जाते.
ट्विटरवर चर्चा सुरु आहेय की व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचे खासगी बोलणे एकतेय. व्हॉट्सअप आपल्या प्लॅटफॉर्मला एंड टू एंड एन्क्रिप्टेड म्हणते. Foad Dabiri यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. जेव्हा ते झोपले होते, तेव्हा व्हॉट्सअप त्यांच्या स्मार्टफोनचा मायक्रोफोन वापरत होता, असा आरोप त्यांनी केला आहे.
डाबिरीयांनी एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. यामध्ये व्हाट्सएप त्यांच्या फोनचा मायक्रोफोन किती वेळा वापरत आहे हे दिसत आहे. या ट्विटला रिट्विट करत इलॉन मस्क यांनी व्हॉट्सअॅपवर विश्वास ठेवता येणार नाही, असे म्हटले आहे.
डाबिरी यांच्याकडे गुगलचा पिक्सल ७ प्रो हा स्मार्टफोन आहे. यावर थर्ड पार्टी अॅप्स नसतात, क्लिन युआयचा अनुभव मिळतो. ते रात्री झोपले असतानाही WhatsApp त्यांच्या फोनचा मायक्रोफोन वापरत होता. महत्वाचे म्हणजे डाबिरी हा ट्विटरचा इंजिनिअर आहे. आता या प्रकरणावर व्हॉट्सअॅपने प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकार एखाद्या बगमुळे झाला असावा. आम्ही त्याच्या संपर्कात आहोत, असे व्हॉट्सअपने म्हटले आहे.