अरे वा! लो-एन्ड स्मार्टफोन्सवर देखील खेळता येणार PUBG; BGMI Lite लवकरच येणार भारतात
By सिद्धेश जाधव | Published: November 17, 2021 08:00 PM2021-11-17T20:00:46+5:302021-11-17T20:00:52+5:30
BGMI Lite Launch Date: गेम डेव्हलपरने BGMI Lite व्हर्जन BGMI च्या ऑफिशियल डिस्कॉर्ड चॅनेलवर टीज केला आहे. त्यामुळे Battlegrounds Mobile India Lite लवकरच लाँच होईल, असा अंदाज लावला जात आहे.
BGMI Lite Launch Date: जूनमध्ये Battleground Mobile India भारतात उपलब्ध झाला होता. तेव्हा PUBG च्या चाहत्यांनी या गेमचे जोरदार स्वागत केले होते. परंतु लोकप्रिय गेमचे पुनरागमन होऊन देखील काही पबजी लव्हर्स मात्र नाराज होते. कारण मोठ्या प्रमाणावर गेमर्सकडे लो एन्ड स्मार्टफोन होते. त्यामुळे कमी रॅम आणि स्पेक्स असलेले स्मार्टफोन युजर्स Battlegrounds Mobile India (BGMI) च्या ‘Lite’ व्हर्जनची अपेक्षा करत होते.
आता ही अपेक्षा पूर्ण होणार असल्याचे दिसत आहे. कारण गेम डेव्हलपरने BGMI Lite व्हर्जन BGMI च्या ऑफिशियल डिस्कॉर्ड चॅनेलवर टीज केला आहे. त्यामुळे Battlegrounds Mobile India Lite लवकरच लाँच होईल, असा अंदाज लावला जात आहे. भारतात पबजी गेम बॅन होण्याआधी PUBG Mobile Lite स्वस्त स्मार्टफोन युजर्स वापरणाऱ्या लोकांमध्ये लोकप्रिय होता.
Battlegrounds Mobile India Lite लाँच
लवकरच लोकप्रिय Battlegrounds Mobile India अर्थात BGMI चा लाईट व्हर्जन डेव्हलपर सादर करू शकतो. या गेमच्या लाँचसाठी एक सर्वे डेव्हलपरने ऑफिशियल डिस्कॉर्ड चॅनेलवर शेयर केला आहे. या सर्व्हेमध्ये पुढील चार पर्याय देण्यात आले आहेत.
- मला माझ्या लो-अँड डिवाइसवर BGMI खेळता येत नाही.
- मला BGMI खेळता येते, परंतु स्मार्टफोनमध्ये लाईट व्हर्जनचा फ्रेम रेट आणि परफॉर्मंस चांगली मिळते.
- मी लाईट व्हर्जनवर पैसे खर्च केले आहेत आणि मला डेटा ट्रान्सफर करायचा आहे. .
- मला लाईट व्हर्जनमधील मॅप आणि स्किन आवडतात.
या सर्वेमधून जास्त माहिती मिळाली नसली तरी Krafton कंपनी BGMI Lite चा विचार करत आहे, हे मात्र निश्चित झाले आहे. लोकप्रिय गेमर ‘घातक’ नुसार BGMI Lite गेम डिसेंबर मध्ये रिलीज केला जाऊ शकतो.