“हेच तर हवं होतं!”; BGMI मधील नवीन Arena: Assault मोड पाहून गेमर्सनी मानले डेव्हलपरचे आभार
By सिद्धेश जाधव | Published: April 8, 2022 12:22 PM2022-04-08T12:22:18+5:302022-04-08T12:22:42+5:30
Battlegrounds Mobile India मध्ये एक नवीन Arena Mode: Assault मोड जोडण्यात आला आहे.
Battlegrounds Mobile India गेममध्ये एक नवीन Arena Mode: Assault जोडण्यात आला आहे. 18 मार्चला आलेल्या 1.9 अपडेटनंतर आता हा नवीन मोड डेव्हलपर क्राफ्टननं जोडला आहे. मार्च अपडेटमध्ये देखील नवीन मोड्स आणि इव्हेंट्स आले होते.
BGMI गेमच्या द डेथ मॅच मोडमध्ये आणखी एक मॅप जोडण्यात आल्याची माहिती BGMI च्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून देण्यात आली आहे. Arena Mode: Assault चं गेमर्सनी स्वागत केलं आहे. अनेकांनी या मोड विषयी उत्सुकता दर्शवली आहे. तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.
काय आहे नवीन मॅपमध्ये
Arena Mode: Assault हे Battlegrounds Mobile India मधील आधीच्या दोन मॅप्सचं मिश्रण म्हणता येईल. आर्केड मोडमधील वॉर आणि अरेनामधील द डेथ मॅचला एकत्र करण्याचा प्रयत्न क्राफ्टननं केला आहे. हा मोड खेळण्यासाठी प्लेयर्सना अनरँक सेक्शनमध्ये जावं लागेल, जिथे प्लेयर्स मॅचमेकिंग करता येईल. नवीन TDM मोड Royale Arena: Assault Erangel आणि Livik मॅप उपलब्ध होतील. या दोन क्लासिक मॅप्समधील काही निवडक ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्क्वॉडसह उरतवण्यात येईल. इथे तुम्हाला 40 किल्स घ्यावे लागतील. प्लेयर्स अनिलमिटेड वेळा रीस्पॉन होऊ शकतील.
या नवीन असॉल्ट मोड मध्ये प्लेयर्सना अनेक वेपन्स निवडताना येतील. तसेच यात दोन एयरड्रॉप्स देखील मिळतील, ज्यात लेव्हल 3 हेलमेट मिळू शकतो. BGMI साठी कालपासून म्हणजे 7 एप्रिलला नवीन TDM (Team Deathmatch Mode) रोल आउट करण्यात आला आहे. या नवीन मोडचा आकार 27MB आहे.