Mobile, Fiber आणि DTH चे येणार एकच बिल; जियोला टक्कर देण्यासाठी Airtel Black प्लॅन्स लाँच 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 04:32 PM2021-07-02T16:32:01+5:302021-07-02T16:32:52+5:30

Airtel Black: Airtel ने भारतात नवीन एयरटेल ब्लॅक प्लॅन लाँच केले आहेत. या ऑल इन वन प्लॅन्समध्ये मोबाईल, फायबर आणि डीटीएच कनेक्शन अश्या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.  

Bharti airtel launches one plan for mobile services broadband and dth services  | Mobile, Fiber आणि DTH चे येणार एकच बिल; जियोला टक्कर देण्यासाठी Airtel Black प्लॅन्स लाँच 

Mobile, Fiber आणि DTH चे येणार एकच बिल; जियोला टक्कर देण्यासाठी Airtel Black प्लॅन्स लाँच 

googlenewsNext

आज भारतात भरती एयरटेलने Airtel Black प्लॅन्स लाँच केले आहेत. हे प्लॅन्स प्रत्येक कुटुंबाचे पहिले ऑल-इन-वन सॉल्यूशन आहेत, असा दावा कंपनीने केला आहे. या नवीन प्लॅन्समध्ये कंपनी युजर्सना फक्त एका रिचार्जमध्ये सर्व सुविधा देत आहे. वेगवेगळ्या सुविधांसाठी वेगवेगेळे रिचार्ज प्लॅन्सचे पैसे देण्याचे झंझट टाळता यावे म्हणून कंपनीने हे प्लॅन्स आणले आहेत. (Airtel's New Airtel Black Plans From Rs 998 Bundle Mobile, Xstream Broadband And DTH) 

Airtel Black 

एयरटेल ब्लॅकमध्ये ग्राहकांना एका बिलमध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक एयरटेल सेवांचा वापर करता येईल. या सेवांमध्ये फायबर, डीटीएच आणि मोबाईलचा समावेश आहे. या सेवांसाठी एक खास कस्टमर केयर नंबर देण्यात येईल आणि रिलेशनशिप मॅनेजर नियुक्त केला जाईल.  

Airtel Black चे प्लॅन्स  

  • 2099 रुपयांमध्ये 3 मोबाईल कनेक्शन, 1 फायबर कनेक्शन आणि 1 डीटीएच कनेक्शन महिनाभर वापरता येईल.  
  • 1598 रुपयांमध्ये 2 मोबाईल कनेक्शन आणि 1 फायबर कनेक्शन महिनाभर वापरता येईल.  
  • 1349 रुपयांमध्ये 3 मोबाईल कनेक्शन आणि 1 डीटीएच कनेक्शन महिनाभर वापरता येईल.  
  • 998 रुपयांमध्ये 2 मोबाईल कनेक्शन आणि 1 डीटीएच कनेक्शन महिनाभर वापरता येईल.  

एयरटेल ग्राहक त्यांच्या सोयीनुसार हे प्लॅन्स कस्टमाइज देखील करू शकतात. तुम्ही यात मिळणारा डेटा स्पीड, चॅनल्स आणि इतर अनेक गोष्टी कस्टमाइज करू शकता.  

Airtel Black प्लॅन घेण्यासाठी  

  • एयरटेल ब्लॅक प्लॅन घेण्यासाठी Airtel Thanks App डाउनलोड करा आणि Airtel Black Plan वर जा. तिथे तुम्ही तुमचा चालू प्लॅनमध्ये बदल करू शकता किंवा नवीन कस्टमाइज प्लॅन बनवू शकता.  
  • जवळच्या एयरटेल स्टोरवर देखील एयरटेल ब्लॅकची माहिती देण्यात येईल.  
  • 8826655555 वर मिस्ड कॉल दिल्यास एक एयरटेल अधिकारी तुमच्या घरी येऊन तुमचा प्लॅन एयरटेल ब्लॅकमध्ये अपग्रेड करेल.  
  • या प्लॅन्सबाबत अधिक माहितीसाठी https://www.airtel.in/airtel-black इथे उपलब्ध आहे.  

Web Title: Bharti airtel launches one plan for mobile services broadband and dth services 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.