Facebook युजर्ससाठी मोठी बातमी! आता एक मिनिटाचा व्हिडीओ बनवून कमवू शकता पैसे; जाणून घ्या, काय करावं लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 02:00 PM2021-03-12T14:00:28+5:302021-03-12T14:06:45+5:30

big news for facebook users : फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट क्रिएटर्सला (content creators) जाहिरातींद्वारे शॉर्ट-फॉर्म व्हिडिओंची कमाई करण्यास अनुमती देईल, असे  फेसबुक इंकने (Facebook Inc) गुरुवारी सांगितले.

Big news for Facebook users! Now you can make money by making one minute videos; Know, what to do? | Facebook युजर्ससाठी मोठी बातमी! आता एक मिनिटाचा व्हिडीओ बनवून कमवू शकता पैसे; जाणून घ्या, काय करावं लागेल?

Facebook युजर्ससाठी मोठी बातमी! आता एक मिनिटाचा व्हिडीओ बनवून कमवू शकता पैसे; जाणून घ्या, काय करावं लागेल?

Next
ठळक मुद्देकंपनीच्या ब्लॉगमध्ये असे सांगण्यात आले आहे की, फेसबुक आता क्रिएटर्सला अधिक पैसे कमविण्यास मदत करेल.

नवी दिल्ली : तुम्हाला जर सोशल मीडियावरून (Social Media) पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook) लोकांना पैसे मिळविण्याची संधी देत ​​आहे. फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट क्रिएटर्सला (content creators) जाहिरातींद्वारे शॉर्ट-फॉर्म व्हिडिओंची कमाई करण्यास अनुमती देईल, असे  फेसबुक इंकने (Facebook Inc) गुरुवारी सांगितले. कंपनीने ब्लॉगद्वारे ही घोषणा केली आहे.  (big news for facebook users now you will be able to earn money by making one minute videos)

कंपनीच्या ब्लॉगमध्ये असे सांगण्यात आले आहे की, फेसबुक आता क्रिएटर्सला अधिक पैसे कमविण्यास मदत करेल. याठिकाणी क्रिएटर्स शॉर्ट व्हिडिओ बनवून जाहिरातींद्वारे पैसे कमवू शकतील, यासाठी कंपनी योजना तयार करत आहे. याशिवाय, लोक कोण-कोणत्या मार्गांनी फेसबुकवर पैसे कमवू शकतात, हे फेसबुकनेही सांगितले आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

एक मिनिटांपर्यंतच्या व्हिडीओपासून मिळतील पैसे
कंपनी आता सोशल नेटवर्कवरील कंटेंट क्रिएटर्ससाठी कमाईचे पर्याय वाढवत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फेसबुकवरील युजर्स एका मिनिटापर्यंत व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकतील. मात्र, अट अशी आहे की, या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कमीतकमी 30 सेकंदाची जाहिरात प्ले करणे आवश्यक आहे. तसेच, तीन मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या व्हिडिओसाठी जवळपास 45 सेकंदाची जाहिरात दाखविली पाहिजे. याचा अर्थ असा की आपल्या आवडत्या क्रिएटर्सला त्यांच्या व्हिडिओंमधून अधिक पैसे मिळतील. दरम्यान, यापूर्वी केवळ तीन मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या व्हिडिओंवर लोक जाहिरातींद्वारे पैसे कमवू शकत होते, ज्यामध्ये एक मिनिटापूर्वी कोणतीही जाहिरात दाखविली जात नव्हती.

पोस्टला पाहिजेत सहा लाख views
कंपनीचे म्हणणे आहे की, युजर्स किंवा पेजला गेल्या 60 दिवसांत त्यांच्या व्हिडिओमध्ये एकूण 6 लाख views आवश्यकता असणार आहे. लाईव्ह व्हिडिओच्या नवीन जाहिरात सिस्टमसाठी लोकांच्या व्हिडिओजला 60,000 मिनिटांचे व्हिडिओ पाहिलेच पाहिजे. 
कंपनी आपल्या आवडत्या पेजला एक 'स्टार'सह टिप करण्यासाठी नवीन फीचरवरही काम करत आहे. दरम्यान, कंपनी आधीच आपल्या इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर (Instagram) व्हिडिओंमध्ये जाहिराती दाखवते. त्या जाहिराती दाखविण्यासोबत आता कंपनी नवीन प्रयोग करीत आहे.

Web Title: Big news for Facebook users! Now you can make money by making one minute videos; Know, what to do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.