WhatsApp वर आता जाहिराती दिसणार? 'फ्री' होणारी कामं बंद होणार? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 03:59 PM2023-09-16T15:59:37+5:302023-09-16T16:01:58+5:30

व्हॉट्सअ‍ॅपसाठी पैसे घेण्याच्या बातमीचे आधी खंडन करण्यात आले होते पण आता...

Big News for WhatsApp users as it says no ad revenue plan or paid version for India | WhatsApp वर आता जाहिराती दिसणार? 'फ्री' होणारी कामं बंद होणार? जाणून घ्या सविस्तर

WhatsApp वर आता जाहिराती दिसणार? 'फ्री' होणारी कामं बंद होणार? जाणून घ्या सविस्तर

googlenewsNext

WhatsApp Paid or Not : सध्या आपण जे WhatsApp वापरतो, ते पूर्णपणे मोफत आहे. पण बरेचदा बातम्या येतात की व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. नुकतीच पुन्हा एक अशी बातमी आली आहे की आता व्हॉट्सअ‍ॅपवरजाहिराती दिसणार आहेत. असा दावा केला जात आहे की मेटा प्लॅटफॉर्म आपली कमाई वाढवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर जाहिराती दाखवण्याचा विचार करत आहे. 'जाहिरातमुक्त व्हॉट्सअ‍ॅप' चालवण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागेल. म्हणजे एक प्रकारे व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याचे पैसे घेतले जातील. या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, ते जाणून घेऊया.

WhatsApp खरंच Paid होणार का?

व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याचे पैसे घेतले जाणार या वृत्ताचे त्यांनी याआधी खंडन केले होते, पण आता व्हॉट्सअ‍ॅपने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. स्पष्टीकरणातील माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप पेड करण्याची कोणतीही योजना आहे. कंपनी सध्या अ‍ॅप-मधील जाहिराती (In-App Ads) दाखवण्याचा अजिबात विचार करत नाही. या आधीही व्हॉट्सअ‍ॅप पेड करण्याचा मुद्दा अनेक वेळा उपस्थित केला गेला आहे. भारत आणि ब्राझीलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे मधूनमधून अशा अफवा येत असतात.

व्हॉट्सअ‍ॅपच्या लंडन युनिटचे प्रॉडक्ट डायरेक्टर अ‍ॅलिस न्यूटन-रेक्स यांचे म्हणणे आहे की, अनेक वर्षांपासून लोक व्हॉट्सअ‍ॅपवर व्यवसायांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अहवालानुसार, भारत आणि ब्राझीलसारख्या देशांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा वापर दैनंदिन काम आणि व्यवसायासाठी केला जातो. उदाहरणार्थ, ट्रेन आणि बसची तिकिटे बुक करण्यापासून ते ऑनलाइन उत्पादने ऑर्डर करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत व्हॉट्सअ‍ॅपची मदत घेतली जाते. अशा परिस्थितीत, व्हॉट्सअ‍ॅपवर जितके जास्त संभाषण होतील तितका जास्त महसूल मिळवता येईल. या मॉडेलमधून पैसे कमावल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत. पण व्हॉट्सअ‍ॅपने मात्र हे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले आहे.

Web Title: Big News for WhatsApp users as it says no ad revenue plan or paid version for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.