Jio Price Hike: जिओच्या ग्राहकांना मोठा झटका! 150 रुपयांनी महागला स्वस्त प्लॅन, जाणून घ्या डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 20:43 IST2022-06-04T20:40:21+5:302022-06-04T20:43:32+5:30
जिओने कोणतीही माहिती न देता अचानकपणे हा प्लॅन 150 रुपयांनी महाग केला आहे.

Jio Price Hike: जिओच्या ग्राहकांना मोठा झटका! 150 रुपयांनी महागला स्वस्त प्लॅन, जाणून घ्या डिटेल्स
जिओने आपला एक स्वस्त आणि परवडणारा प्लॅन आता महाग केला आहे. या स्वस्त प्लॅनची किंमत आता वाढवण्यात आली आहे. कंपनीचा हा प्लॅन कमी किमतीत एक वर्षाच्या वैधतेसह येतो. यात यूजर्सना कॉलिंग आणि डेटा बेनिफिट्ससोबतच इतरही अनेक फायदे मिळतात.
खरे तर हा प्लॅन सर्वच युजर्ससाठी नाही, कंपनीची ही ऑफर केवळ जिओ फोन युजर्ससाठी आहे. देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर करते. ऑपरेटरच्या पोर्टफोलियोमध्ये प्रीपेड, पोस्टपेड आणि जिओ फोन्ससाठी स्पेशल रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत.
स्वस्त रिचार्ज महागले -
कंपनी Jio फोनसाठी विविध प्रकारचे प्लॅन्स ऑफर करते. कंपनीने अशाच एका रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवली आहे. खरेतर, JioPhone च्या वापरकर्त्यांसाठी 749 रुपयांचा प्लॅन होता. या प्लानमध्ये यूजर्सना एका वर्षासाठी व्हॉईस कॉलिंग आणि 24GB डेटा मिळत होता. या प्लॅन्समध्ये युजर्स जिओ अॅप्सच्या फ्री सब्सक्रिप्शनचाही लाभ घेऊ शकतात. हा प्लॅन अजूनही सुरूच आहे. मात्र, कंपनीने त्याची किंमत वाढवली आहे. जिओने कोणतीही माहिती न देता अचानकपणे हा प्लॅन 150 रुपयांनी महाग केला आहे.
आता किती रुपयांना मिळेल प्लॅन -
आता JioPhone वापरकर्त्यांना या प्लॅनसाठी 899 रुपये मोजावे लागतील. हा प्लॅन केवळ जिओ फोन वापरकर्त्यांसाठीच आहेत. हा प्लॅन आपल्याला सामान्य फोनमध्ये वापरता येणार नाही.