200MP कॅमरा अन्...; BSNL खरंच 5G स्मार्टफोन लॉन्च करणार?; कंपनीने दिली महत्वाची माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 04:55 PM2024-08-11T16:55:28+5:302024-08-11T16:56:26+5:30
खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi ने आपले रिचार्ज प्लॅन महाग केल्यापासून लाखो ग्राहक BSNL चे सिमकार्ड घेत आहेत.
BSNL News : खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi ने आपले रिचार्ज प्लॅन महाग केल्यापासून BSNL साठी 'अच्छे दिन' आले आहेत. या संधीचा फायदा घेण्यासाठी BSNL 4G आणि 5G तंत्रज्ञानावर झपाट्याने काम करत आहे. शिवाय, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक स्वस्त प्लॅन्सदेखील लॉन्च केले आहेत. आता अशातच, सोशल मीडियावर BSNL च्या 5G फोनची चर्चा सुरू झाली आहे.
कंपनीने दिली महत्वाची माहिती...
सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल, काही सांगता येत नाही. पण, व्हायरल झालेल्या प्रत्येक बातम्या खऱ्या असतील, असे नाही. सध्या सोशल मीडियावर BSNLचा 5G स्मार्टफोन लॉन्च झाल्याच्या बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत. BSNL लवकरच 200 मेगापिक्सेलचा 5G स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. पण, आता कंपनीने ट्विट करुन या सर्व बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे.
Don't fall for #FakeNews! 🚫
— BSNL India (@BSNLCorporate) August 9, 2024
Get real updates from our official website https://t.co/kvXWJQYHLt#BSNL#FactCheck#FakeNewsAlertpic.twitter.com/NuEKzkXGeH
काय दावा करण्यात येत आहे?
BSNL च्या 200 मेगापिक्सेल फोनचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढेच नाही, तर व्हायरल झालेल्या बातम्यांमध्ये असा दावाही केला जातोय की, BSNL आपला 5G स्मार्टफोन टाटा कंपनीच्या सहकार्याने तयार करत असून, त्यत 7000mAh ची बॅटरी असेल. पण, आता कंपनीने ट्विटद्वारे ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे सांगितले आहे. 5G स्मार्टफोनच्या नावाने कोणी तुमच्याकडून पैसे घेत असेल, तर तुम्ही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.