बिल भरलेय, तरीही रक्कम खात्यातून गायब! तर काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 06:36 AM2022-06-14T06:36:06+5:302022-06-14T06:36:40+5:30

‘वीजबिल न भरल्यामुळे आज रात्री दहा वाजेपासून तुमची विजेची जोडणी तोडली जाणार आहे.

Bill paid money still missing from account So what do you do | बिल भरलेय, तरीही रक्कम खात्यातून गायब! तर काय कराल?

बिल भरलेय, तरीही रक्कम खात्यातून गायब! तर काय कराल?

Next

वीजबिल न भरल्यामुळे आज रात्री दहा वाजेपासून तुमची विजेची जोडणी तोडली जाणार आहे. हे टाळण्यासाठी कृपया आमच्या ‘या’ अधिकृत क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा’.. मी माझ्या बिलाचा भरणा करूनही वीज बोर्डाकडून हा संदेश मला आला आहे, माझ्या खात्यातून बिलाची रक्कम डेबिट पडलेली आहे. मी काय करावे ? - एक वाचक

 सध्या अनेक प्रकारचे फ्रॉडस होत असतात. फिशिंग हा आपल्या खासगी माहितीवर हल्ला करण्याचा एक प्रकार आहे. त्यात सहसा वापरकर्ता दुसऱ्याचा डेटा चोरण्यासाठी एक जाळे बनवतो आणि त्यात समोरच्याला अडकवतो. हे करतांना हल्लेखोर, विश्वासार्ह व्यक्ती म्हणून मुखवटा धारण करतात.

 एखाद्या बळीला ईमेल, झटपट संदेश किंवा मजकूर संदेश पाठवतात आणि त्याद्वारे त्या बळीच्या बँक खात्यावर ताबा मिळवून त्यावर डल्ला मारतात. 
आपल्याला आलेला मेसेज ‘फ्रॉड’ आहे हे नक्की. असेच मेसेजेस टेलिफोनच्या बिलांच्या संदर्भातदेखील आलेले आहेत. आपण बिल भरलेले असेल आणि आपल्या खात्यावरून बिलाची रक्कम डेबिट पडली असेल तर कोणताच प्रश्न नाही. अगदी आपण बिल भरलेले नसेल तरी अशा मेसेजमध्ये सांगितलेल्या फोन नंबरशी संपर्क साधायचे कारण नाही. वीज मंडळ  किंवा टेलिफोन कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राचे अधिकृत फोन नंबर त्यांच्या संकेतस्थळावर मिळतात. त्यावर त्यांच्याशी संपर्क साधणे खूपच सोपे आहे. ते न करता अशा फसव्या मेसेजेसमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन केलात तर, अनेकदा तुम्हाला एखादे ॲप डाउनलोड करायला सांगितले जाते.

त्यात तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा नंबर, त्याचा पिन नंबर  इत्यादी महत्त्वाची माहिती भरायला सांगण्यात येते. तुम्ही ही माहिती भरली की, तुमच्या खात्यातून भलीथोरली रक्कम काढून घेतले जाते. त्यानंतर तुम्हाला सुरुवातीचा मेसेज करणारा नंबर गायब होतो. सायबर पोलीस त्याचा माग घेण्याचा प्रयत्न करतात, पण एकूणच ते खूप किचकट आणि गुंतागुंतीचे काम असते. त्यामुळे असे मेसेजेस आले तर त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करावे हे उत्तम.

- दिलीप फडके, ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते  
तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : tarkaikaral@gmail.com

Web Title: Bill paid money still missing from account So what do you do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज