सतत व्हिडीओ पाहण्याची सवय पडू शकते महागात; युजर्सचा डेटा धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 12:34 PM2019-10-29T12:34:04+5:302019-10-29T12:35:28+5:30
वेगवेगळे व्हिडीओ पाहायला अनेकांना आवडतं तर काहींना ती सवय असते. मात्र सतत व्हिडीओ पाहणं चांगलंच महागात पडू शकतं.
नवी दिल्ली - भारतासह जगभरात सध्या स्ट्रीमिंग सर्व्हिस अत्यंत लोकप्रिय झाली आहे. त्यामुळेच अनेक मोठ्या कंपन्या देखील आपली स्ट्रीमिंग सर्व्हिस आणत आहेत. यावर अनेक नवनवीन शो तसेच मूव्हिज उपलब्ध असतात. युजर्सची अशा गोष्टींना अधिक पसंती असते. याचप्रमाणे स्मार्टफोनचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. वेगवेगळे व्हिडीओ पाहायला अनेकांना आवडतं तर काहींना ती सवय असते. मात्र सतत व्हिडीओ पाहणं चांगलंच महागात पडू शकतं. यामुळे तुमची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.
व्हि़डीओ पाहणाऱ्या युजर्सचा मोबाईल डेटा हा असुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच व्हिडीओ पाहताना येणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून ही हॅकर्स हॅक करू शकत असल्याची माहिती मिळत आहे. स्ट्रीमिंग सर्व्हिस यूज करताना युजर्सचं लक्ष हे ऑन स्क्रीन अॅक्शनवर असतं. याच दरम्यान टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ट्रॅक केलं जातं. जाहिराती दरम्यान जे युजर्स त्या स्किप करत नाहीत त्या युजर्सचा ईमेल अॅड्रेस, डिव्हाईसचा सीरियल नंबर कलेक्ट करून डिस्ट्रीब्यूट केल्याची माहिती टर फॉर डिजिटल डिमॉक्रेसीचे एझिक्यूटिव्ह डायरेक्टर जेफ चेस्टर यांनी ही माहिती दिली आहे.
युजर्स अनेकदा आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांचा डेटा हा त्यांच्या परमिशनशिवाय कलेक्ट केला जातो. तसेच फेसबुक, गुगल, नेटफ्लिक्ससारख्या कंपन्यांसोबत शेअर केला जात असल्याची माहिती रिसर्चमधून समोर आली आहे. Apple, एनबीसी यूनिवर्सल, वॉल्ट डिजनी आणि वॉर्नर मीडियासारख्या कंपन्या लवकरच कनेक्टेड टेलिव्हिजन आणि अॅमेझॉन, गुगलच्या डिव्हाईसवर स्ट्रीमिंग सर्व्हिस सुरू करणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. मात्र ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण हे सध्या वाढले आहे. गुगलवर एखादी वेबसाईट अथवा यूआरएल ओपन करणं महागात पडू शकतं. त्यामुळे गुगलवर एखादी माहिती शोधताना सतर्क असणं गरजेचं आहे. तसेच ऑनलाईन शॉपिंग करण्याला अनेकजण प्राधान्य देतात. मात्र फार कमी जणांना माहीत असेल की Google कडे युजर्सच्या प्रत्येक ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्स असतात. शॉपिंगच्या बिलची रिसीट आपल्या जी-मेल अकाऊंटवर पाठवून गुगलला याबाबतची माहिती युजर्सचं देत असतात. त्यामुळे या रिसीटच्या माध्यमातून गुगल युजर्सच्या ऑनलाईन शॉपिंगवर नजर ठेवून असतं.