मोठा डिस्प्ले, फास्ट चार्जिंग आणि पावरफुल प्रोसेसर; Black Shark 4 Pro शी कोणीही घेणार नाही पंगा
By सिद्धेश जाधव | Published: February 24, 2022 12:50 PM2022-02-24T12:50:39+5:302022-02-24T12:50:58+5:30
Black Shark 4 Pro स्मार्टफोन जागतिक बाजारात Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर आणि 120W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे.
Black Shark नं चीनमध्ये गेल्यावर्षी मार्चमध्ये Black Shark 4 आणि Black Shark 4 Pro असे दोन गेमिंग स्मार्टफोन लाँच केले होते. आता यातील Black Shark 4 Pro ची जागतिक बाजारात एंट्री झाली आहे. यात Qualcomm Snapdragon 888 चिपसेट, 120W फास्ट चार्जिंग, 64MP कॅमेरा आणि 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया Black Shark 4 Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत.
Black Shark 4 Pro चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल-एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 720 हर्ट्ज टच-सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. या डिवाइसला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरची प्रोसेसिंग पावर मिळते. सोबत 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी ब्लॅक शार्क 4 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी f20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी या गेमिंग स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Black Shark 4 Pro ची किंमत
Black Shark 4 Pro स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 580 डॉलर्स (सुमारे 43,500 रुपये) मोजावे लागतील. तर 12GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 680 डॉलर्स (सुमारे 51,000 रुपये) ठेवण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
- Flipkart Sale: उरले फक्त काही दिवस! फक्त 800 रुपयांमध्ये 3D साऊंड असलेला ‘हा’ शानदार Smart TV घेऊन या घरी
- 9000 हजारांच्या डिस्काउंटसह Realme चा फाडू स्मार्टफोन उपलब्ध; फक्त काही दिवस शिल्लक
- घरबसल्या कमवा 26 लाख महिना; फेसबुकनं सादर केलं भन्नाट फिचर, देणार टिकटॉकला टक्कर