गेमिंगच्या चाहत्यांसाठी खुशखबर! शाओमीने सादर दमदार गेमिंग फीचर्स असलेले दोन भन्नाट फोन्स 

By सिद्धेश जाधव | Published: October 14, 2021 12:41 PM2021-10-14T12:41:43+5:302021-10-14T12:41:50+5:30

Gaming Phones Black Shark 4S and Black Shark 4Pro: शोओमीने आपल्या ब्लॅक शार्क या ब्रँड अंतर्गत Black Shark 4S आणि Black Shark 4S Pro हे दोन Gaming Smartphones सादर केले आहेत.

Black shark 4s and black shark 4s pro gaming smartphones launch price and specifications  | गेमिंगच्या चाहत्यांसाठी खुशखबर! शाओमीने सादर दमदार गेमिंग फीचर्स असलेले दोन भन्नाट फोन्स 

गेमिंगच्या चाहत्यांसाठी खुशखबर! शाओमीने सादर दमदार गेमिंग फीचर्स असलेले दोन भन्नाट फोन्स 

Next

शाओमीच्या सब-ब्रँड Black Shark ने चीनमध्ये Black Shark 4S सीरीजसादर केली आहे. हा ब्रँड Gaming Phone सादर करण्यासाठी ओळखला जातो. या सीरिज अंतर्गत Black Shark 4S आणि Black Shark 4S Pro असे दोन नवीन फोन सादर करण्यात आले आहेत. हे फोन थेट ASUS ROG Phone आणि Nubia Red Magic सीरिजला टक्कर देतील.  

Black Shark 4S, Black Shark 4S Pro स्पेसिफिकेशन्स 

lack Shark 4S मध्ये Qualcomm Snapdragon 870 आणि Black Shark 4S Pro स्मार्टफोन Snapdragon 888+ प्रोसेसरसह सदर करण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये LPDDR5 RAM आणि वेगवान UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. Black Shark 4S सीरीज JOYUI 12.8 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. कनेक्टिविटीसाठी यात 5G, ड्युअल-बँड WiFi 6, Bluetooth 5.2, GNSS, NFC, USB Type-C पोर्ट, आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, RGB लाईट, ड्युअल स्टीरियो स्पिकर, अ‍ॅंबिएंट लाईट सेन्सर, अ‍ॅक्सेरेलोमीटर, प्रॉक्सीमिटी सेन्सर, कंपास, जायरोस्कोप आणि बॅरोमीटर मिळतो. 

दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ E4 AMOLED डिस्प्ले मिळतो. जो 144Hz रिफ्रेश रेट, 720Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1300 नीट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. त्याचबरोबर यात MEMC, DC Dimming, आणि आय प्रोटेक्शन मोड असे फीचर्स देण्यात आले आहेत.  

ब्लॅक शार्कचे दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करतात. ज्यात 8 मेगापिक्सलचा वाईड कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आहे. फक्त स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये 48MP चा आणि प्रो व्हेरिएंट्समध्ये 64MP चा मुख्य सेन्सर आहे. दोन्ही फोन्स 20MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. या फोन्समधील 4,5000mAh ची बॅटरी 120W च्या जबराट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

किंमत 

  • Black Shark 4S (8GB/128GB): 2,699 युआन (सुमारे ₹ 31,600) 
  • Black Shark 4S (12GB/128GB): 2,999 युआन (सुमारे ₹ 35,000)  
  • Black Shark 4S (12GB/256GB): 3,299 युआन (सुमारे ₹ 38,600)  
  • Black Shark 4S Gundam Limited Edition (12GB/256GB): 3,499 युआन (सुमारे ₹ 41,000)  
  • Black Shark 4S Pro (12GB/256GB): 4,799 युआन (सुमारे ₹ 56,100)  
  • Black Shark 4S Pro (16GB/512GB): 5,499 युआन (सुमारे ₹ 64,300)  

Web Title: Black shark 4s and black shark 4s pro gaming smartphones launch price and specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.