आसूसला टक्कर देण्यासाठी शाओमी सज्ज; Black Shark 4S गेमिंग फोन 13 ऑक्टोबरला होणार लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 07:04 PM2021-10-08T19:04:36+5:302021-10-08T19:04:47+5:30
Black Shark 4S ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात येईल. हा फोन व्हाइट कलर व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो.
शाओमी Black Shark या आपल्या ब्रँड अंतर्गत गेमिंग फोन लाँच करते. या ब्रँड अंतर्गत कंपनी Black Shark 4S हा गेमिंग फोन सादर करणार आहे. याची माहिती स्वतः कंपनीने चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिली आहे. Black Shark 4S गेमिंग स्मार्टफोन चीनमध्ये 13 ऑक्टोबरला दुपारी 12.30 वाजता लाँच केला जाईल.
कंपनीने या लाँच इव्हेंटचा एक पोस्टर सोशल मीडियावर शेयर केला आहे. या पोस्टरमधून या स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती समोर आली आहे. त्यानुसार Black Shark 4S ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात येईल. हा फोन व्हाइट कलर व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच या फोनची डिजाईन मोठ्याप्रमाणावर Black Shark 4 सारखी असेल.
Black Shark 4S चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Black Shark 4S स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888+ SoC सह सादर केला जाऊ शकतो. कंपनी या फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी देऊ शकते, अशी माहिती लीक आणि रिपोर्ट्समधून समोर आली आहे. या फोनमध्ये 6.67-इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. हा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा डिवाइस 16GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेजसह बाजारात येऊ शकतो. या फोनमधील मुख्य कॅमेरा 64MP चा असू शकतो. हे लीक स्पेक्स आहेत त्यामुळे ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी 13 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल.