ब्लॅकबेरीचा KEYone स्मार्टफोन भारतात लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 03:46 PM2017-08-01T15:46:31+5:302017-08-01T15:48:48+5:30
सध्या देशातील मोबाईल मार्केटिंगमध्ये नव-नवीन स्मार्टफोन येत आहेत. जागतिक मोबाईल मार्केटमध्ये बहुचर्चित असलेल्या ब्लॅकबेरी कंपनीचा KEYone स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे.
नवी दिल्ली, दि. 01 - सध्या देशातील मोबाईल मार्केटिंगमध्ये नव-नवीन स्मार्टफोन येत आहेत. जागतिक मोबाईल मार्केटमध्ये बहुचर्चित असलेल्या ब्लॅकबेरी कंपनीचा KEYone स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. ब्लॅकबेरीने स्वत: डिझाईन केलेला KEYone स्मार्टफोन शेवटचा फोन आहे. यामध्ये QWERTY कीबोर्ड देण्यात आला असून या स्मार्टफोनची QWERTY कीबोर्ड हीच खाशियत आहे.
ब्लॅकबेरीने KEYone स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याआधी यामध्ये काही बदल केले आहे आहेत. जागतिक मोबाईल मार्केटमध्ये ज्यावेळी KEYone स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला. त्यावेळी या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी देण्यात आली होती. मात्र, आता भारतामध्ये लॉन्च करण्यात आला, त्यावेळी यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.
ब्लॅकबेरी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, KEYone स्मार्टफोन मध्ये डबल सिम कार्ड वापरण्याचा ऑप्शन दिला आहे. याआधी जेवढे मोबाईल मार्केटमध्ये ब्लॅकबेरीने स्मार्टफोन आणले त्यापैकी KEYone स्मार्टफोन हा पहिला डबल सिम असलेला स्मार्टफोन आहे. KEYone स्मार्टफोनची पुढील आठवड्यात अॅमेझॉन इंडियावर विक्री होणार असून याची किंमत 39,990 रुपये इतकी आहे. याचबरोबर लॉन्चिंग ऑफर म्हणून या स्मार्टफोनसोबत वोडाफोनच्यावतीने 75 जीबी डाटा देण्यात येणार आहे. हा वोडाफोन डाटा प्रिपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी आहे.
काय आहेत KEYone स्मार्टफोनमध्ये फीचर्स...
- सिक्युरिटी मॉनिटरिंग अॅप DTEK आहे.
- ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.1.1 Nougat.
- 12 पिक्सेल.
- अद्यावत QWERTY कीबोर्ड.
- 12 मेगापिक्सल कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा.
- 4.5 इंच फुल एचडी डिस्प्ले.
- क्लॉल्कॉम स्नॅपड्रगन 625 ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम.
- मायक्रो एसडी कार्ड.
- 3,050mAh बॅटरी.