4 जानेवारीपासून डब्बा होणार हे स्मार्टफोन्स; स्वतः कंपनीनं केली घोषणा, कॉल-मेसेज देखील होणार बंद
By सिद्धेश जाधव | Published: January 1, 2022 07:03 PM2022-01-01T19:03:11+5:302022-01-01T19:03:33+5:30
ब्लॅकबेरी 7.1 ओएस आणि त्याआधीच्या ओएस तसेच ब्लॅकबेरी 10 सॉफ्टवेयरवर चालणाऱ्या ब्लॅकबेरी फोन्सना यावर्षी 4 जानेवारीनंतर लेगसी सेवा मिळणार नाही.
ब्लॅकबेरी फोन 4 जानेवारीपासून निरुपयोगी ठरणार आहे. पुढील आठवड्यात फोन्सची जवळपास सर्व फीचर्स बंद होतील. ब्लॅकबेरीनं काही वर्षांपूर्वी आपले लोकप्रिय QWERTY कीपॅड आणि ब्लॅकबेरीओएस असलेले फोन्स बनवणे बंद केले होते. परंतु त्यांचा सॉफ्टवेयर सपोर्ट अजूनही दिला जात होता. कंपनी आता 4 जानेवारी 2021 ला ब्लॅकबेरीओएस डिवाइसेसचा अधिकृतपणे सपोर्ट बंद करणार आहे.
ब्लॅकबेरी 7.1 ओएस आणि त्याआधीच्या ओएस तसेच ब्लॅकबेरी 10 सॉफ्टवेयरवर चालणाऱ्या ब्लॅकबेरी फोन्सना यावर्षी 4 जानेवारीनंतर लेगसी सेवा मिळणार नाही. अर्थात या फोन्स फोन कॉलिंग आणि टेक्स्टिंग सारखी कामं देखील करू शकणार नाहीत. ब्लॅकबेरीनी ही माहिती एका ब्लॉग पोस्ट मधून दिली आहे.
यानंतर पुढे कंपनी काय करेल याबाबत ठोस माहिती समोर आली नाही. कंपनी अँड्रॉइड ओएस असलेले स्मार्टफोन्स देखील सादर करते. कदचित कंपनी अँड्रॉइडवर लक्ष देण्यास सुरुवात करू शकते. परंतु याची कंपनीनं कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
दोन वर्षांपूर्वीच BBM सपोर्ट बंद करण्यात आला होता
ब्लॅकबेरी आपल्या BBM या मेसेंजरसाठी देखील प्रसिद्ध होती. परंतु व्हॉट्सअॅप आणि इतर इन्स्टंट मेसेजिंग अॅप्सच्या उदयामुळे कंपीनी 2019 मध्ये लोकप्रिय ब्लॅकबेरी मेसेंजर सेवा बंद केली होती.
हे देखील वाचा:
OMG! फक्त 7.5 हजारांत दमदार LED TV; नवीन वर्षात Flipkart देतंय बंपर डिस्काउंट
शरीराचं तापमान सांगणारा Smartwatch; Omicron विरोधात ठरू शकतो उपयुक्त, किंमत 2 हजारांच्या आत