Blaupunkt चे ‘मेड इन इंडिया’ स्मार्ट टीव्ही लाँच; किंमत 14999 रुपयांपासून सुरु 

By सिद्धेश जाधव | Published: July 9, 2021 01:07 PM2021-07-09T13:07:14+5:302021-07-09T13:07:39+5:30

जर्मन कंपनी Blaupunket ने भारतात Made in India स्मार्ट टीव्ही सीरीज लाँच केली आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होत आहे.  

blaupunkt cybersound series smart tvs launched price in india rs 14999 specifications features full hd 4k hdr android tv | Blaupunkt चे ‘मेड इन इंडिया’ स्मार्ट टीव्ही लाँच; किंमत 14999 रुपयांपासून सुरु 

Blaupunkt चे ‘मेड इन इंडिया’ स्मार्ट टीव्ही लाँच; किंमत 14999 रुपयांपासून सुरु 

Next

जर्मन ब्रँड Blaupunket ने भारतात चार स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. हे Made in India स्मार्ट टीव्ही आहेत. या स्मार्ट टीव्हीची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होत आहे. कंपनीने हे टीव्ही Cybersound या सीरिजमध्ये 32 इंच ते 55 इंचाचे टीव्ही मॉडेल HD ते UHD रिजोल्यूशनसह सादर केले आहेत. Android TV सपोर्ट असलेले हे टीव्ही 10 जुलैपासून फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होतील. 

किंमत 

या सीरीजमधील 32-inch HD Ready Cybersound Smart TV ची किंमत 14,999 रुपये आहे. तर, 42- inch FHD Android TV ची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या सीरिजमधील तिसरा मॉडेल 43-inch 4K TV ची किंमत 30,999 रुपये आहे. तर सीरिजमधील प्रीमियम मॉडेल 55-inch 4K TV ची किंमत 40,999 रुपये आहे.  

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स  

32 इंचाच्या टीव्हीमध्ये HD Ready Cybersound फीचर देण्यात आला आहे. हा टीव्ही बेजललेस डिस्प्ले डिजाइनसह सादर करण्यात आला आहे. यात 1GB रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा स्मार्ट टीव्ही Android TV 9 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात आउटपुट साउंडसाठी 40W चा स्पीकर देण्यात आला आहे. 42 इंचाच्या FHD Android TV चे फीचर्स 32 इंच मॉडेल सारखे आहेत.  

43 इंचाच्या 4K Android TV देखील बेजललेस डिस्प्ले डिजाइन सादर करण्यात आली आहे. यात Dolby Digital Plus, DTS TruSurround, Dolby MS12 साउंड टेक्नॉलॉजी असे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये चार स्पिकर्स देण्यात आले आहेत. यात आउटपुट साउंडसाठी 50W चा स्पिकर आहे. Android TV 10 वर चालणाऱ्या या स्मार्ट टीव्हीमध्ये 2GB RAM + 8GB स्टोरेज मिळते. 

Blaupunkt CyberSound सीरिजमधील प्रीमियम मॉडेल 55-inch 4K TV मध्ये 60W चा साउंड आउटपुट स्पिकर आहे. हा स्मार्ट टीव्ही Dolby Digital Plus, DTS TruSurround certified audio, Dolby MS12 सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो. हा टीव्ही देखील Android TV 10 ओएसवर चालतो. यात 2GB RAM + 8GB स्टोरेज मिळते. चार स्पिकर्स, दोन USB पोर्ट आणि तीन HDMI पोर्ट देण्यात आले आहेत.  

Web Title: blaupunkt cybersound series smart tvs launched price in india rs 14999 specifications features full hd 4k hdr android tv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.