Bluetooth Earbuds: 1300 रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्वदेशी TWS Earbuds लाँच; स्टायलिश डिजाईनसह 20 तासांचा बॅटरी बॅकअप
By सिद्धेश जाधव | Published: December 9, 2021 01:08 PM2021-12-09T13:08:19+5:302021-12-09T13:08:28+5:30
Bluetooth Earbuds: Ptron Bassbuds Tango नावानं नवीन TWS Earbuds भारतात लाँच करण्यात आले आहेत. ज्यात व्हॉइस असिस्टंट सपोर्ट, ENC आणि मूव्ही मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Ptron Bassbuds Tango नावानं नवीन TWS Earbuds भारतात लाँच करण्यात आले आहेत. Ptron एक भारतीय ब्रँड आहे. या नव्या वायरलेस इयरबड्समध्ये एनवायर्नमेंटल नॉइज कॅन्सलेशन (ENC) फिचर देण्यात आलं आहे. जे आजूबाजूचा आवाज फिल्टर करण्यास मदत करतं, त्यामुळे कॉलवर बोलताना बॅकग्राऊंड नॉइज जात नाही.
Ptron Bassbuds Tango ची किंमत
Ptron Bassbuds Tango इयरबड्स अॅमेझॉनवर 1,299 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. तर Ptron च्या वेबसाईटवर या बड्सची किंमत 1,799 रुपये ठेवण्यात आली आहे. हे इयरबड्स अॅक्टिव्ह ब्लॅक आणि स्टोन व्हाइट अशा दोन कलरमध्ये विकत घेता येतील.
Ptron Bassbuds Tango चे स्पेसिफिकेशन
Ptron Bassbuds Tango ट्रू वायरलेस इयरबड्समध्ये 13mm बास-बूस्टेड ऑडियो ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. यातील इनबिल्ट AAC कोडॅक आणि Acoustic Echo Cancellation याची साऊंड क्वॉलिटी सुधारतात. या इयरबड्समधील इन-ईयर डिजाइन पॅसिव नॉइज कॅन्सल करण्यास मदत करते. यातील मुव्ही मोड चित्र आणि आवाज यात कमी लॅग देतो.
Ptron च्या या बड्समध्ये वन-स्टेप पेयरिंगसह ब्लूटूथ v5.1 कनेक्टिविटी देण्यात आली आहे. जी 10 मीटरपर्यंतची रेंज देते. तसेच यातील IPX4 रेटिंग पाणी आणि धुळीपासून याचे संरक्षण करते. इयरबड्स कंट्रोल करण्यासाठी टच कंट्रोल देण्यात आले आहेत. ज्यांच्या मदतीनं मोड चेंज करणं, कॉल मॅनेज करणं आणि स्मार्टफोनचा वॉयस देखील असिस्टंट अॅक्टिव्हेट करता येतो.
Ptron Bassbuds Tango च्या चार्जिंग केसमध्ये 400mAh ची बॅटरी आहे. केसच्या मदतीनं 20 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाईम मिळू शकतो. यात चार्जिंगसाठी USB टाईप-C फास्ट चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीनं चार्ज केल्यास 10 मिनिटांत तीन तासांपर्यंतचा प्लेबॅक टाईम मिळू शकतो.