boAt नं लॉन्च केलं जबरदस्त स्मार्टवॉच; कॉलिंग फीचरसह मिळणार ७०० हून अधिक मोड्स, किंमतही कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 12:36 PM2024-07-06T12:36:36+5:302024-07-06T12:37:57+5:30
गुरुवारी कंपनीनं Boat Lunar Oasis हे स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. या स्मार्टवॉचमध्ये १.४३ इंचाचा AMOLED ऑलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आलेला आहे. पाहूया यासह स्मार्टवॉचमध्ये कोणते आहे जबरदस्त फीचर्स.
देशातील हेडफोन्स आणि गॅजेट्स उत्पादक कंपनी बोट बद्दल माहित नसेल अशी कोणीही व्यक्ती नसेल. बोट ही कंपनी सातत्यानं नवनवी उत्पादनं सादर करत असतं. आता गुरुवारी कंपनीनं Boat Lunar Oasis हे स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. या स्मार्टवॉचमध्ये १.४३ इंचाचा AMOLED ऑलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याशिवाय या स्मार्टवॉचच्या मदतीनं तुम्ही कॉलिंगही करू शकता. हे वॉच IP68 रेटेड वॉटर रेझिस्टंससह येतं.
Boat Lunar Oasis मध्ये ७०० पेक्षा अधिक अॅक्टिव्ह मोड्स देण्यात आले असून यामध्ये युझर्सना ७ दिवसांपर्यंतचा बॅटरी बॅक अप मिळतो. या स्मार्टफोनची किंमत ३,२९९ रुपये इतकी आहे. हे स्मार्टवॉच तीन स्ट्रॅप ऑप्शनसह येतं. ग्राहक हे स्मार्टवॉच ऑनलाइन खरेदी करू शकतात. हे स्मार्टवॉच एका वर्षाच्या वॉरंटीसह येतं.
Boat Lunar Oasis या नव्याकोऱ्या स्मार्टवॉचचे फीचर्स पाहण्यासाठी आणि ते खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा >> https://amzn.to/3RXrGXj
काय आहेत फीचर्स?
बोट लूनर ओएसिसमध्ये १.४३ इंचाचा अमोलेड डिस्प्ले (४६६×४६६ पिक्सल) देण्यात आला असून त्याचा ब्राइटनेस ६०० निट्स आहे. यासह यात २.५ डी सर्क्युलर स्क्रीन असून तो ऑलवेज-ऑन सपोर्टसह आणि UP द्वारे नेव्हिगेट करण्याच्या क्राऊनसह येतो. हे स्मार्टवॉच Cres+ OS वर चालतं आणि हे बोटच्या इन-हाऊस X1 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. याशिवाय स्मार्टवॉचमध्ये MapmyIndia टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सपोर्ट, DIY वॉच फेस स्टुडियोचा समावेश करण्यात आला आहे. DIY वॉच फेस स्टुडियोच्या माध्यमातून युझर्सना त्यांच्या मूड आणि आऊटफिट्सनुसार कस्टमाईज्ड फेस तयार करता येणार आहेत.
बोट क्रेस्ट अॅपसह, बोट लूनर ओएसिसचा वापर ब्लड ऑक्सिजन सॅच्युरेशन (SpO2) रेट आणि हार्ट रेट ट्रॅक करण्यासाठी केला जाऊ शकतो. स्लीप आणि स्ट्रेस मॉनिटर करण्यासाठी आवश्यक सेन्सरही या स्मार्टवॉचमध्ये देण्यात आलाय. याशिवाय या वियरेबल डिव्हाइसमध्ये अॅक्टिव्हिटी ट्रॅकरदेखील देण्यात आला आहे. अॅपच्या माध्यमातून युझर्स फिटनेस प्रेमींना जोडता येऊ शकतं आणि कस्टम रन प्लॅन तयार करू शकतात.